Rabindranath Tagore

या नोबेल पारितोषिक विजेत्या भारतीयाने परत केली होती ब्रिटिशांची सर ही उपाधी जाणून घ्या कोण आहेत ते भारतीय

रवींद्रनाथ टागोर  हे एक बंगाली कवी व लेखक होते. त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी  कलकत्ता येथे झाला होता. त्यांना ३ जून १९१५ रोजी गीतांजलीं या काव्य संग्रहासाठी देण्यात आला होता. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते  होते.

नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना सर म्हणजेच नाइटहुड ही उपाधी दिली  होती. परंतु १३ एप्रिल १९१९  रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झाले या हत्याकांडात हजारो निष्पाप भारतीयांना अतिशय क्रूरपणे गोळ्या झाडून मारण्यात आले.

या घटनेचा निषेध करण्यासाठी रवींद्र्नाथ टागोर यांनी सर ही उपाधी ब्रिटिश सरकारला परत केली. ज्या रक्तांनी माखलेल्या  हातांनी हजारो निष्पपाप भारतीयांचे जीव घेतले त्या हातांनी कोणतीही उपाधी घेणे अयोग्य आहे.

असे उदगार काढले होते. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत.