Articles Inspirational National

अबब..! सौदी अरेबियामध्ये एकही नदी नाही, ते पाणी कुठून आणतात? जाणून घ्या आश्चर्यचकित करणारी माहिती

Saudi Arabia water source information in marathi
Saudi Arabia water source information in marathi

सौदी अरेबिया हा वाळवंटामध्ये वसलेला एक देश असून या देशामध्ये एकही नदी किंवा झरा अस्तित्वात नाही मग अशा परिस्थितीमध्ये याठिकाणी पाणी उपलब्ध कसे होते हा उत्सुकतेचा विषय आहे. सौदी अरेबिया मध्ये भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी सुद्धा खूपच कमी आहे अशा परिस्थितीमध्ये पिण्याचे पाणी आणि अन्य गरजांसाठी या ठिकाणचे लोक पाणी कुठून आणतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

सौदी अरेबिया मध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व पाण्याचे संधारण करण्यासाठी अँक्विफायर हा एक महत्वपूर्ण स्त्रोत आहे. अँक्विफायर ही भूपृष्ठाखालील पाण्याचे संधारण करण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे.भूपृष्ठाखालील पाण्याला साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या दगडांच्या थराचा यामध्ये वापर केला जातो.सौदी अरेबियामध्ये 1971 सालापासून या पद्धतीचा वापर करणे सुरू झाले. 1971 सालापासून सौदी अरेबियामध्ये सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात अँक्विफायर साठी सबसिडी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये अँक्विफायर चे प्रमाण वाढले आणि याचा उपयोग नागरी आणि कृषी या हेतूंसाठी केला जातो

पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचा अभाव असलेल्या सौदी अरेबिया मध्ये अन्य एक दुसरा स्त्रोत म्हणजे समुद्री पाणी होय. समुद्राच्या पाण्यामध्ये असलेले क्षार आणि मीठ यांच्यामुळे हे पाणी पिण्यालायक नसते. मात्र डिसिलेशन प्रक्रियेद्वारे समुद्राच्या पाण्यातील पिण्यासाठी हानिकारक असलेल्या व अन्य तत्सम घटकांना दूर केले जाते व हे पाणी पिण्यालायक बनवले जाते.सौदी अरेबियामध्ये डिसिलेशन ही प्रक्रिया पाण्याचे स्त्रोता साठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.सेलिन वाँटर काँन्झर्वेशन सेंटर द्वारे  वॉटर स्टेशनला डेसिलिनेशन प्रक्रिया कार्यान्वित केली जाते व याद्वारे साधारण 3 मिल्लियन लिटर इतके पिण्याचे पाणी दररोज निर्माण होते .डिसिलेशन प्लांट मध्ये निर्माण होणाऱ्या पाण्याचा उपयोग हा मुख्यत्वे शहरी पाण्याची गरज भागवण्यासाठी होतो. तसेच या प्लांट मधून निर्माण होणारे पाणी हे उद्योगांच्या वापरासाठी सुद्धा वापरले जाते. डिसेलेशन द्वारे निर्माण केले जाणारे पाणी हे जलविद्युत निर्मितीचा मुख्य स्त्रोत आहे.

पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात ‘कतार, कुवेत इत्यादी देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी साधारणपणे सत्तर टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या डिसेलिनेशन पाण्याचा वापर केला जातो.

उत्तर आफ्रिकेमधील लिबिया आणि अल्जेरिया या देशांमध्ये संपूर्ण विश्वामध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या डिसेलिनेटेड पाण्यापैकी सुमारे सहा टक्के इतके पाणी वापरले जाते.

डिसेलिनेशन आणि अँक्विफायर या तंत्रज्ञानाव्यतिरिक्त पाण्याचा पुनर्वापर करण्यावरही  भर दिला जातो व यासाठीच सौदी अरेबिया सरकारकडून शहरी भागातील पाण्याचा कमीत कमी 40 टक्के इतका भाग पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी रियाद ,जेहाद इत्यादी ठिकाणांच्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये निरनिराळे उपक्रम हाती घेतले जातात व पाण्याच्या पुनर्वापरासाठीचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उभारले गेले आहेत.

 पाण्याच्या पुनर्वापराअंतर्गत शहरी भागातील उद्याना मधील झाडांसाठी व सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो.