fbpx
farmer

शेतकऱ्यांना आत्त्महत्या का करावी लागते ? जाणून घ्या Inside Story

राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचा दावा सुरु असताना राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी 8 हजार रुपये नुकसानभरपाईची घोषणा केली. मात्र हि घोषणा खरंच पुरेशी आहे का ? याचा विचार त्यांनी करायला हवा होता.

farmer
farmer

मात्र यामध्ये खरेतर त्यांची काहीही चुकी नसून ज्या राज्यकर्त्यांना यासाठी नेमले होते त्यांनी सत्तेचा खेळखंडोबा केला होता. मात्र अखेर महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा खेळखंडोबा अखेर संपला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सरकार स्थापन केले असून उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

farmer
farmer

मात्र या सगळ्यात शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे कुणीही लक्ष दिलेलं नसून आम्ही तुम्हाला आज शेतकऱ्यांना किती खर्च येतो आणि शासनाच्या या तुटपुंजा मदतीत काय होते याचे गणित मांडणार आहोत.

त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन अपमान करणाऱ्या सरकारच्या डोळ्यात डोळ्यात अंजन घालणारा हा जळजळीत लेख एकदा जरूर वाचा

तर चला पाहुयात हे गणित

  1. एक हेक्टर म्हणजे जवळपास अडीच एकर. नांगरणी करायची असेल तर एका एकराला 3 तास लागतात. ट्रॅक्टरवाले 400 रुपये प्रतितास घेतात, म्हणजे 1,200 रुपये एका एकरासाठी आणि एका हेक्टरसाठी 3 हजार रुपये लागतात.
  2. पेरायच्या वेळेस वखरपाळी करण्यासाठी एकराला 500 रुपये मजुरी द्यावी लागते. एका हेक्टरसाठी हे 1,250 रुपये होतात.
  3. पेरणी करायला एका एकराला एका थैलीसाठी ट्रॅक्टर 500 रुपये घेतं. अडीच एकरासाठी 1,250 रुपये.
  4. सोयाबीनच्या बियाची एक थैली 2,200 रुपयाला मिळते. अडीच एकरात अडीच बॅगा लागतात. त्यासाठी 3,600 रुपये लागतात.
  5. एक डीएपीची (एक प्रकाराचं खत) थैली 1,500 रुपये ते 1,700 रुपयाला मिळते. हा जवळपास 11 हजार रुपये खर्च फक्त लागवडीसाठी येतो.
  6. त्यानंतर दोन वेळा फवारणी केली जाते. एका हेक्टरला फवारणीसाठी हजार रुपये लागतात, दोन हेक्टरसाठी 2 हजार रुपये.
  7. एका एकरावरील पीक कापणीसाठी मजूर 3 हजार रुपये घेतो. अडीच हेक्टरचे 7 हजार रुपये झाले. म्हणजे असं सगळं एका हेक्टरसाठी जवळपास 22 हजार रुपये खर्च येतो. यात निंदणं, तननाशक फवारणं पकडल्यास 25 हजार रुपये लागतात.
  8. सरकारची नुकसानभरपाई योग्य आहे का – “सरकार जी मदत देतं, ती अपुरी आहे. ही मदत फक्त एक अनुदान असतं, नुकसान भरपाई नाही. नुकसान तर एक हेक्टरवर पीक घेण्यासाठी लागलेले 25 हजार आणि पिकाच्या विक्रीतून जो काही पैसा हातात आला असता, असे मिळून लाखभर रुपयाचं झालेलं असतं.
farmers
farmers

त्यामुळे शहरात राहणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांच्या या भावनेचा समाज नसला तरीही या येणाऱ्या नवीन सरकारने शेतकऱ्यांसाठी विधायक कार्य करून आपल्या शेतकरी बांधवाना योग्य न्याय द्यावा हि अपेक्षा.