fbpx
Kavita Devi - Being Maharashtrian

कविता देवी WWE ची पहिली भारतीय महिला सुपरस्टार

कविता देवी WWE ची पहिली भारतीय महिला सुपरस्टार

Kavita Devi - Being Marathi
Kavita Devi – Being Marathi

WWE ने कविता देवी यांचे नाव आपल्या Mae Young Classic Tournament च्या 32 वर्षावरील गटात अधिकृतपणे जाहीर केले. 34 वर्षीय कविताने WWE च्या यादीत आपले नाव शामिल करून 1.3 दशलक्ष भारतीयांच्या माना गर्वाने उंचावल्या आहे.

Kavita Devi - Being Marathi
Kavita Devi – Being Marathi

कविता देवी हे तिचे रिंगणातील नाव. तिचे मूळ नाव कविता दलाल. ती मूळची हरियाणा राज्यातील जिंद या जिल्ह्यातील माळवी या गावाची. गावाची लोकसंख्या 6000 इतकी असून येथे मैदानी खेळ खेळणाऱ्या होतकरूंसाठी पुरेश्या सुविधा नाही.

तसेच हरियाणा हे राज्य स्त्री-पुरुष भेदभाव आणि स्त्रीभ्रूण हत्येसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. अशा या राज्यातील कविताने मिळवलेले हे यश सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरलेलं आहे.

Kavita Devi - Being Marathi
Kavita Devi – Being Marathi

कविता हि खेड्यात वाढली आणि तिने आपले विद्यालयीन शिक्षण जुलाना येथील महिला शाळेत पूर्ण केलं. कविता एका मुलाखती  दरम्यान म्हणाली की, ती अशा समाजात वाढली की जिथे मुलीला 10 वी च्या पुढे शिकण्यास विरोध होता.

Kavita Devi - Being Marathi
Kavita Devi – Being Marathi

या सगळ्या विरोधाला फेटाळत कविताने आपली बी.ए ची पदवी पूर्ण केली. या सर्वांचे श्रेय ती आपल्या मोठा भाऊ संदीप दलाल याला देते. त्याने तिला उच्च शिक्षणाबरोबर वेटलिफ्टर ही बनवले.

Kavita Devi - Being Marathi
Rupal Deshmukh