fbpx

महाआघाडीत या पक्षाकडे असणार सर्वात जास्त मंत्रीपदे

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे तर विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाली आहे . पण महत्वाचे म्हणजे कोणत्या पक्षाला किती व कोणती मंत्रीपद मिळतात यावर सर्वांचे आता लक्ष लागून राहिले आहे .सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मंत्रिपद वाटपामध्ये खरी पावर ही राष्ट्रवादीकडेच राहणार आहे .

ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला १५ ,कॉंग्रेसला १२ आणि राष्ट्रवादीला १६ त्याच बरोबर उपमुख्यमंत्रीपद देखील राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत . त्यामुळे या महाआघाडीत राष्ट्रवादीवादीचे वजन राहणार हे मात्र या वरून स्पष्ट होत आहे .

त्याच बरोबर राष्ट्रवादीतुन अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी एका आमदारांच्या गटाकडून केली जात आहे .त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व अलबेल आहे कि नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे .

त्यामुळे भविष्यात सर्व निर्णय घेताना उद्धव ठाकरेंना अजित पवार आणि राष्ट्रवादी समोर नमते घ्यावे लागणार हे मात्र नक्की . त्यामुळे मातोश्रीला प्रत्येक वेळी निर्णय घेताना सिल्वर ओकला जावे लागणार हे मात्र नक्की .