उदयनराजे देणार खासदारकीचा राजीनामा; पंतप्रधानांच्या उपस्थित घेणार कमळ हातात…!

0
956

पुणे दि.१३ – राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आज खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे रात्री आठ वाजता राजीनामा सादर करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उदयनराजे दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 14) होणार आहे. उदयनराजेंनी काल सायंकाळी कार्यकर्त्यांशी बोलून आपला निर्णय त्यांच्याजवळ जाहीर केला होता. त्यांनी अद्याप प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन त्याची घोषणा केलेली नाही._

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का! भास्कर जाधवांच्या हाती धनुष्यबाण..

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनेक विद्यमान आमदार भाजपमध्ये गेले आहेत. मात्र खासदारांपैकी उदयनराजे हे एकमेव आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारण त्यामुळे ढवळून निघाले आहे. राजेंनी राजीनामा दिल्यानंतर सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीसोबत ती होण्याची शक्यता नाही.