जखमी अवस्थेत सापडलेल्या अजगराला सर्पमित्रा कडून जीवदान

0
217

सुखळवाड येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या अजगराला सर्पमित्र अनिल गावडे यांच्याकडून जीवदान. अजगराला सर्जरीसाठी नेले कोल्हापूरला, जिल्ह्यातील गेल्या २ महिन्यातील दुसरी घटना

कुडाळ दि कृष्णा सावंत :- ओरस मधील सर्पमित्र प्रणव राणे यांना मालवण सुखळवाड येथे जखमी अवस्थेत अजगर सापडला त्यांनी कुडाळ पिंगुळीतील सर्पमित्र अनिल गावडे यांना फोन करून याची माहिती दिली असता सर्पमित्र अनिल गावडे आणि सर्पमित्र प्रणव राणे यांनी या एकत्र येत या अजगर जातीच्या सापाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या अजगराला जनतेची अमानुष मारहाण झाली होती तो अजगर जखमी आवसतेत होता.या दोन्ही सर्पमित्र,अनिल गावडे,आणि प्रणव राणे यांनी अजगराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.या जखमी असलेल्या अजगराला कोल्हापूर सर्पमित्र प्रविण सुतार यांना संपर्क करून हकीगत सांगितली आणि या दोन्ही सर्पमित्रांनी त्या अजगराला घेऊन कोल्हापूर गाठले, अजगराला जनतेची अमानुष मारहाण झाल्याने त्याची सर्जरी करवी लागली,अजगराची सर्जरी पूर्ण झाली.

Wildlife Emergency Service कोल्हापूर यांच्या वतीने सर्जरीचा पुर्ण खर्च उचलण्यात आला.गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल गावडे यांनी नागपंचमीच्या दिवशी एका सापाला कोल्हापूर येथे सर्जरीसाठी नेऊन त्याला जीवदान दिले होते.आणि आता अजगराला जीवदान दिले आहे.सर्पमित्र अनिल गावडे यांचे कार्य कवतुक करण्यासारखे आहे.

त्या दरम्यान कोल्हापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष वाळवेकर यांच्या आदेशाने ८दिवस कोल्हापूरला सर्पमित्र म्हणून अनिल गावडे वास्तव्यास होते,सिंधुदुर्गातुन एकमेव सर्पमित्र म्हणून अनिल गावडे होते,कोल्हापूर सर्पमित्र प्रविण सुतार यांना मदत म्हणून ८ दिवसात ३०० च्या वर सापांना कोल्हापूर जिल्ह्यातुन जीवदान देण्यात आले आहे. कोल्हापूर वनविभागाची वन्यजीवांच्या संरक्षणासाठी चांगलीच मदत त्यांना झाली.सर्पमित्र अनिल गावडे यांनी लाईव्ह महाराष्ट्र शी बोलताना सांगीतलं