राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार १७ सप्टेंबरपासून निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौर्‍यावर…

0
188

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार १७ सप्टेंबरपासून निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौर्‍यावर. सोलापूरपासून दौर्‍याची सुरुवात ;उत्तर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयात बैठका.

मुंबई दि.आशिता परब* राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १७ सप्टेंबरपासून निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौर्‍यावर असून या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून करणार आहेत.

१७ ते २२ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यामध्ये सभा ऐवजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेणार आहेत.

१७ सप्टेंबरपासून सोलापुर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा याठिकाणी बैठका घेणार आहेत.

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप- सेनेच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा करत आहेत.