दादा कोंडके विषयी दहा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल…

हसताय ना हसलंच पाहिजे असे म्हणत सध्या टेलिव्हिजनवर अनेक कॉमेडी शो सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहेत. माणसाच्या ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये मनोरंजनाच्या जगात हास्याची एक सुंदर अशी लकेर निर्माण करण्याचे काम हे  विनोदी कार्यक्रम करत असतात. चार्ली चँपलीन पासून अनेक विनोदी कलाकारांनी आपल्या अनोख्या अदाकारीने प्रेक्षकांना दोन घटका हसवून अक्षरशः पुण्याचे काम केलेले आहे. अनेक विनोदी कलाकारांना विनोद सम्राट अशा सुद्धा उपाध्या सध्याच्या काळात दिल्या जातात मात्र मुळात मनोरंजनाच्या जगामध्ये किंवा चित्रपट सृष्टी मध्ये आणि तेसुद्धा मराठी चित्रपटांमध्ये माणसाच्या व्यंग्याला , दुर्बलतेला,असुरक्षिततेला हसत हसत कारुण्याची झालर देऊन एक सकारात्मकता निर्माण करण्याचे श्रेय हे विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आज सुद्धा दिले जाते.

मराठी चित्रपट सृष्टीतीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विनोदाची दूनिया ही दादा कोंडके यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दादा कोंडके यांचे संपूर्ण आयुष्य हे जणू काही एक अविस्मरणीय अशी सफरचआहे .पडद्यावर सर्वसामान्य प्रेक्षकांना पासून ते अगदी उच्चभ्रू वर्तुळा पर्यंत सर्वांना हसवणाऱ्या व काहीशा द्वयर्थी संवादांमुळे टीकेचा धनी होणाऱ्या दादा कोंडके यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील बऱ्याच गोष्टी या त्यांच्या चाहत्यांना आजही माहीत नाहीत .अशाच काही तथ्यां बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

1) 8 ऑगस्ट 1932 रोजी कृष्णा दादा कोंडके अर्थातच दादा कोंडके यांचा जन्म झाला. तांबडी माती हा दादा कोंडके यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट होय. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट त्या काळामध्ये दिले. चंदू जमादार,राम राम गंगाराम, एकटा जीव सदाशिव, तुमच आमच जमल, अंधेरी रात में दिया तेरे हात में या यशस्वी चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः खेचून चित्रपटगृहांमध्ये आणले.

2) चित्रपट सृष्टीतील पडद्यावरील विनोदाचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या दादा कोंडके यांच्या अभिनयाची सुरुवात ही रंगभूमीवरून झाली. 1965 झाली आलेल्या विच्छा माझी पुरी करा या वगनाटकाद्वारे त्यांनी खर्‍या अर्थाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1965 ते 1975 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये या नाटकाचे जवळपास पंधराशे प्रयोग झाले यावरून या नाटकाची लोकप्रियता आपल्या लक्षात येऊ शकते.

3) यानंतरच्या आयुष्यामध्ये लोकप्रियता आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या दादा कोंडके यांचे बालपण मात्र लालबागच्या गिरणी कामगारांसाठीच्या चाळीमध्ये गेले. या काळामध्ये ते अतिशय बंडखोर वृत्तीचे होते व यामधूनच कोणत्याही गोष्टीवर अतिशय आक्रमक पद्धतीने ते व्यक्त होत. अनेक मारामा-या करण्यामध्येही त्यांचा सहभाग होता व त्यांना त्या भागांमध्ये दादा म्हणूनच ओळखले जात होते.

4) 1971 साली दादा कोंडके यांनी निर्मिती केलेल्या पहिला चित्रपट सोंगाड्या प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सुपरहिट ठरत मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते मात्र या चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गात अनेक अडथळे आले होते. कोहिनूर या चित्रपटगृहात दादांच्या सोंगाड्या चित्रपटा ऐवजी तीन देवीया या हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र यावेळी दादा कोंडके यांनी शिवसेनेला आपला चित्रपट प्रदर्शित करून देण्यासाठी मदत मागितली. कोहिनूर चित्रपटगृहाच्या समोर शिवसेनेने आंदोलन केले व हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा लागला. मात्र सोंगाड्या हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मध्ये एक नवीन सुरुवात घेऊन आलेला चित्रपट ठरला.

5) सोंगाड्या या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शिवसेनेने केलेली मदत लक्षात ठेवून दादा कोंडके हे शिवसेनेच्या सभांना विशेष करून व्यासपीठावर हजेरी लावत असत व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी त्याकाळी होत असे.
6) कोणत्याही पी आर किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी उपलब्ध नसणाऱ्या काळामध्ये दादा कोंडके यांचे तब्बल नऊ चित्रपट लागोपाठ 25 आठवडे चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी खेचत होते व  या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

7) विनोदी चित्रपटांमध्ये अगदी साधा,भोळा ,अडाणी नायक रंगवणाऱ्या दादा कोंडके यांच्या प्रत्यक्ष आयुष्यामधील राजकीय जाणिवा व अभ्यास प्रचंड होता त्यांची राजकीय वर्तुळामधील उठबस सुद्धा लक्षणीय होती व यामुळेच एका चाळीतून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या दादा कोंडके यांना राजकीय महत्वकांक्षा सुद्धा होत्या. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती हे त्यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीमध्ये बोलून दाखवले होते मात्र त्यांचे राजकारणामध्ये सक्रिय रित्या सहभागी होणे हे स्वप्नच राहिले.

8) दादांचे वडील हे गिरणी कामगार होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये ही दादांनी कलेची सेवा ही बँड वादनाच्या साह्याने केली .दादा कोंडके अँड पार्टी हे कलापथक सुद्धा दादा कोंडके हे कलापथकही तयांनी स्थापन केले होते त्यामुळे त्यांना त्या काळामध्ये बँडवाले दादा म्हणूनही ओळखले जात असे. वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या विच्छा माझी पुरी करा या वगनाट्याचे प्रयोगही हाऊसफुल्ल होत असत. आशा भोसले या मुंबईतील विच्छा माझी पुरी करा च्या प्रत्येक प्रयोगाला अगदी न चुकता हजर रहात असत व दादां मधील अभिनयाला ओळखून त्यांनी भालजी पेंढारकरांकडे दादांना अभिनया साठी पाठवले होते.

9) दादांनी कामाक्षी प्रोडक्शन ही स्वतःची कंपनी काढली होती व या चित्रपट निर्मिती कंपनी मधून त्यांनी दोन हिंदी व चार गुजराती चित्रपटांची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे कामाक्षी प्रोडक्शन मध्ये काम करणाऱ्या अभिनेते व तंत्रज्ञ यांची टीम सदैव एकच राहिली त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही.
10) दादा कोंडके यांची लोकप्रियता किती अफाट होती हे 1975 साली आलेल्या त्यांच्या पांडू हवालदार या चित्रपटाच्या लोकप्रियते वरुन कळते .पांडू हवालदार मध्ये दादा कोंडकेंनी अशोक सराफ यांना संधी दिली होती. पांडू हवलदार या चित्रपटाने सर्व चित्रपटगृहांना इतके व्यापून टाकले होते की हॉलीवूडमधील द मॅन विथ द गोल्डन गन या चित्रपटाला प्रदर्शीत करण्यासाठी अक्षरशः चित्रपटगृह मिळत नव्हते व जेम्स बॉण्ड चा हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सपेशल आपटला.