भाजपचे १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ?

0
12137

राज्यात सत्तास्थापनेवरून सन्स्पेन्स सुरु असून त्याचदरम्यान भाजपचे १५ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे १५ आमदार महाशिवआघाडीच्या निर्णयाची वाट पाहत असून लवकरच हे आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

Loading...

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसल्यानंतर शिवसेनेनं आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्तास्थापनेची तयारी सुरु केली असून लवकरच तिन्हीपक्ष सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या आमदारांकडे वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. मात्र भाजपदेखील सत्तास्थापनेचा दावा करत असून आमदार फ़ुटलेच तर हा भाजपसाठी फार मोठा धक्का असणार आहे.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने देखील भाजपचे १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमके किती आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत आणि या बातमीत काही तथ्य आहे कि नाही हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच. मात्र सध्यातरी सत्तास्थापनेवरून राज्यात गोंधळ सुरु असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे.

Loading...

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीमध्ये सत्तास्थापनेचा प्रश्न शिवसेना आणि भाजपला विचारा असे म्हणून या सगळ्यामध्ये गोंधळ निर्माण केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या देखील चिंतेत भर पडली असून काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
Loading...