Maharashtra National News Politician Politics

हे भविष्यवाणी कशाच्या आधारे करतात, हेच समजत नाही” राज ठाकरेंना काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्यांचा टोला

raj thakre
raj thakre

महाविकास आघाडी सरकारवर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भाजपसह सगळेच विरोधी पक्ष या तीन चाकाच्या सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या सरकारवर टीका केल्यानंतर आता काँग्रेस मंत्री आणि नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडी सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार” असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. “सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही” असा टोला थोरातांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. याआधी “हे सरकार जास्त काळ टिकणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं आताही सांगतोय हे सरकार जास्त काळ टिकणार नाही” असे राज ठाकरे म्हणाले होते.

त्यामुळे सरकारमधील सदस्य म्हणून बाळासाहेब थोरात यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. याविषयी अधिक बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले कि,हे भविष्यवाणी कशावर आणि कशाच्या आधारे करतात हे मला काही समजलेलं नाही. फार कमी कालखंड आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आघाडी सरकारचं काम पाहिलं, तर ते निश्चितच चांगलं आहे. कामांची यादी पाहिली तर खूप मोठी आहे आणि किमान समान कार्यक्रम आम्ही राबवत आहोत” असे थोरात म्हणाले.

दरम्यान, मला माहिती नाही ते सरकार टिकणार नाही हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत, पण मी सांगतो हे सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार आणि 100% चांगलं काम करणार” असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या देखील वक्त्यव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले कि,भारतीय माणसाला आणि विशेषतः मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशन काय असतं, हे माहितीही नाही. यांच्या मनात हे विचार येतातच कसे? हे कोणत्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात हा प्रश्न आहे. हा भारतीय संस्कृतीतला शब्द नाही. त्यांनी माहिती घ्यावी आणि याबाबतीत आत्मचिंतन करावं” असा सल्ला थोरातांनी दिला. “हे लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार आहे. आम्ही पाडायची गरज नाही स्वतःहून पडेल” या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते.

About the author

Being Maharashtrian