…म्हणून माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे करणार या पक्षात प्रवेश

0
2205

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला मुख्यमंत्र्यांन कडून ग्रीन सिग्नल_*

मुंबई-: राणे यांचे महाराष्ट्रात मोठे कर्तृत्व आहे साहेब हे भाजपात असणे गरजेचे आहे शिवसेनेशी याबाबत आम्ही चर्चा केली आहे ज्यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठवले त्यावेळी शिवसेनेला याबाबत कल्पना दिली होती त्यावेळी त्यांचा विरोध होता मात्र हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे तो घेणार असे आम्ही सांगितले

यामुळे राणे साहेब भाजपा बरोबर आहेत हे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा विषय नाही राणे साहेब जर आमच्या बरोबर असतील तर चांगले आहे भाजपा बरोबर राहण्याची त्यांची ही मानसिकता आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे

यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होणार या चर्चेला ग्रीन सिग्नल दिला आहे यामुळे काही दिवसातच नारायण राणे हे भाजपा बरोबर दिसतील अशी चर्चा आहे.