Agriculture Maharashtra National News

खूशखबर ! खात्यात दरवर्षी जमा होणार ३६ हजार, वाचा काय आहे नक्की

pm modi
pm modi

केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनंतर आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पहिली पेन्सहून योजना आणली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम शेतकरी मानधन योजनेअंतर्गत हि पेन्शन मिळणार आहे. देशभरातील जवळपास २० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्रालयाने अर्ज मागवले असून यामध्ये शेतकरी आपले नाव नोंदवू शकतात. या योजनेत आतापर्यन्त जवळपास साडेसहा लाख महिला शेतकऱ्यांनी आपले नाव नोंदवलं आहे. ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे, ज्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून आहे.

या योजनेत हरियाणा, बिहार आणि उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांनी नाव नोंदवले आहे. यामध्ये हरियाणातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांनी आपले नाव नोंदवले आहे. तर बिहारमधील ३ लाख शेतकऱ्यांनी आपले नाव नोंदवले आहे. तर झारखंड-उत्तरप्रदेशमधील जवळपास अडीच-अडीच लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 26 ते 35 वर्ष वय असणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक रुची दाखवली आहे.

या योजनेसाठी किती खर्च

१) या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना विशिष्ठ रक्कम गुंतवावी लागणार आहे. हि योजना १८ ते ४० वय असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. यासाठी त्यांच्याकडे जास्तीतजास्त पाच एकर अर्थात 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे.

२) यामध्ये २० वर्ष वय असणाऱ्या शेतकऱ्यांना कमीतकमी ५५ रुपये प्रतिमाह भरावे लागणार आहेत. तर ४० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या शेतकऱ्यांना कमीतकमी २०० रुपये भरावे लागणार आहेत.

३) या योजनेत तुम्हाला सहभागी व्हायचे असेल आणि तुमचे वय जर १८ वर्ष आले तर तुम्हाला महिन्याला कमीतकमी ५५ रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच वर्षाला ६६० रुपये भरावे लागणार आहेत. जर 40 वर्षांचे असताना या योजनेत जोडले गेलात तर महिन्याला २०० म्हणजेच वार्षित २४०० रुपये द्यावे लागतील.

नाव नोंदणी कशी कराल

१)या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर (CSC)वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
२)नोंदणीकरता आधार कार्ड, 2 फोटो आणि बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे. या रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. नोंदणी [पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याचा पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड बनवण्यात येईल.त्यानंतर तुम्हाला याचा लाभ घेता येईल.
महत्वाचे वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना महिना ३००० रुपये पेन्शन मिळू लागेल. पॉलिसी होल्डर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम मिळत राहील

About the author

Being Maharashtrian