Maharashtra National News Politician Politics

कोर्टाने निकाल तथ्यांवर नव्हे तर भावनांवर दिल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा राम मंदिराबाबत दावा

prakash-ambedkar
prakash-ambedkar

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर समितीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर अयोध्येत अयोध्येत राम  मंदिर उभारणीची तयारी देखील मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. त्यानंतर आता राम मंदिराच्या भूमिपूजनेचा मुहूर्त नक्की झाला आहे. त्यामुळे या मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या हा भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे.

   राम मंदिर निर्माण तीर्थ ट्रस्ट’च्या  झालेल्या मोठ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मोदी अयोध्येत आलेत तर पंतप्रधान झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच अयोध्याभेट ठरणार आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते या भव्य राम मंदिराच्या निर्माणच पाया रचला जाणार आहे. त्यानंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. यामध्ये आता  वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.  अयोध्या राम मंदिराचा निकाल हा तथ्य किंवा पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते”, असं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.  त्याचबरोबर पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

  याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले कि, जगात भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते. मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे की वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत. हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाहीत. अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र त्याबाबतचा निकाल हा तथ्यांवर नव्हे तर भावनांवर देण्यात आला  आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच “राहुल संस्कृती हे इतिहासकार आहे. त्यांनी सांगितले की, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला आणि पुराव्यांना ग्राहय धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असे सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला.

  दरम्यान, न्यायालयाच्या निकालावर देखील आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे. मात्र सध्या येथे राम मंदिराच्या उभारणीची गरज आहे असे जरी न्यायालयाने निकाल देताना म्हटले असते तरी चालले असते असे मत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. भारतीयांकडे ज्या संशयित नजरेने पाहिले जाते ते दूर झाले असते. कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहेत, असा मतप्रवाह सगळीकडे झाला असता, असंदेखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.