Maharashtra National News Politician Politics

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका ; भाजप नेते राम शिंदे यांची खरमरीत टीका

ram_shinde
ram_shinde

सध्या राज्यात दूधदराविरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात दूध दरावरून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. अहमदनगरसह संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यासाठी आंदोलन सुरु असून खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डीत तर माजी मंत्री राम शिंदे यांनी नगर सोलापूर महामार्गावर आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभे राहून शेतकऱ्यांना मोफत दूध वाटप करून आंदोलन करत महाविकास आघाडीचा निषेध केला.त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारवर माजी मंत्री राम शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले कि, आजचं आंदोलन महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत” असं राम शिंदे म्हणाले.

त्याचबरोबर हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे, प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही” असा आरोप राम शिंदे यांनी केला. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्याचं हातवर पोट आहे, त्याला कुठलीही मदत राज्य सरकारने केली नाही, फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे, असंही टीकास्त्र राम शिंदे यांनी सोडलं.त्यामुळे आता सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर सुजय विखेंनी मोठा दावा केला आहे.शिवसेनेचा कट्टर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. हा कार्यकर्ता राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत एकत्र येणार आहे’, असा दावा विखेंनी केला आहे.

About the author

Being Maharashtrian