अबब…! थायलंड बद्दल माहित नसलेल्या २२ गोष्टी, २० वि गोस्ट वाचून तुम्ही हि व्याल चकित

गेल्या काही दशकांमध्ये भारतीय पर्यटकांनी  पर्यटनासाठी परदेशात जाण्याचा कल जास्त दिसून येत आहे. विदेशातील पर्यटनामध्ये सुद्धा थायलँड पर्यटनाला विशेष पसंती पर्यटकांकडून दिली जाते . एखाद्या देशाविषयी ऐकीव माहितीच्या आधारे आपण विशिष्ट मत बनवत असतो मात्र यामधील सत्य सुद्धा जाणून घेणे गरजेचे असते .आज आपण थायलंड या राष्ट्राबाबतीत अशीच काही तथ्य जाणून घेणार आहोत.

1) थायलंडच्या राजधानीचे नाव बँकाँक आहे. बँकॉकला मोठ्या संख्येने दरवर्षी पर्यटक भेट देत असतात. त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल दहा टक्के लोकसंख्या बँकाँकमध्ये वास्तव्य करते. बँकाँक थायलंड मधील सर्वात मोठे शहर आहे.
2) थायलंड हे एकमेव दक्षिण आशियाई राष्ट्र आहे ज्याच्यावर युरोपियन राष्ट्रांनी वसाहत निर्माण केलेली नाही त्यामुळे त्याला लँड आँफ फ्रिडम असे  असे म्हटले जाते.
3) थायलंड मध्ये सर्वात महाकाय आणि आकाराने सर्वात लहान असे दोन्ही प्रकारचे सस्तन प्राणी आढळून येतात .थायलंडमध्ये बंबल बी वटवाघुळ हे आकाराने सर्वात लहान असलेला सस्तन प्राणी आढळून येतो तर सर्वात महाकाय म्हणून प्रसिद्ध असलेला व्हेल शार्कसुद्धा थायलंडच्या समुद्रामध्ये आढळून येतो.
4) थायलंडमध्ये  मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्खू आढळून येतात. एक काळ असा होता की जेव्हा सर्वच पुरुषांना वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत बौद्ध भिक्खू म्हणून राहावे लागत असे पण आता ही प्रथा येथे  अस्तित्वात नाही.
5) थायलंडमध्ये राजघराण्याचे शासन चालते व येथील जनतेच्या मनात राजाप्रती प्रचंड आदर आहे. येथील राजघराण्याच्या विरोधात एखादे मत व्यक्त केले किंवा काही कृती केली तर संबंधित व्यक्तीला तुरुंगवास होतो. या देशातील जनतेचे आपल्या राजावर निरतिशय  प्रेम आहे की द किंग  अँड आय हा चित्रपट आपल्या राजाचा अवमान करण्यासारखा आहे या भावनेने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर थायलंडमध्ये बंदी घालण्यात आली होती.

6) थायलंड हे मूलतः मंदिरांचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. थायलंडमध्ये साधारणपणे 35000 इतकी मंदिरे आहेत .याठिकाणी मंदिरात जाताना साधेपणाने व अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून न जाणे बंधनकारक आहे.
7) थायलंड मध्ये अभिवादन करण्यासाठी डोक्याचा वापर करणे खूप सहज आहे .याठिकाणी एखाद्याच्या डोक्याला मग ते एखादे छोटे मुल जरी असले तरीही ते अपमानास्पद मानले जाते म्हणून आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला डोके झुकवून आदर देण्याची पद्धत इथे पाळली जाते.
8) थायलंड हे वन्यजीव आणि पक्षांनी समृद्ध असे राष्ट्र आहे .थायलंडमध्ये युरोप आणि। अमेरिकेपेक्षा पक्षांची संख्या खूप जास्त आहे.
9) थायलंडचे राष्ट्रीय फूल ऑर्चिड आहे. थायलंडमध्ये आँर्चिडच्या जवळपास पंधराशे प्रजाती अस्तित्वात आहेत .यामुळेच थायलंड हे संपूर्ण जगभरातील आँर्चिड निर्यात करणारे प्रमुख राष्ट्र आहे.

10) थायलँड हत्तींसाठी प्रसिद्ध आहे .सध्या याठिकाणी हत्तींची संख्या कमी असली तरी काही काळापूर्वी जवळपास एक लाख इतकी त्यांची लोकसंख्या होती असे सांगितले जाते .सध्या थायलंडमध्ये 5000 पेक्षा जास्त हत्ती आहेत व यांपैकी निम्मे माणसाळलेले आहेत.
11) थायलंड मध्ये राष्ट्रीय ध्वज आणि राजघराण्याचा ध्वज वेगळे आढळून येतात.थायलंडमध्ये दररोज सकाळी आठ वाजता राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि सहा वाजता तो उतरवला जातो .राष्ट्रध्वजाच्या बाजूलाच राजघराण्याचा ध्वज सुद्धा फडकवलेला दिसून येतो.

12) थायलंडमध्ये मध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते आणि सध्या दरवर्षी साधारण साठ लाख पर्यटक भेट देतात असा अंदाज वर्तवला जातो.
13) थायलंड मधील नागरिकांच्या शांतताप्रिय व सदैव हसतमुख स्वभावामुळे थायलंडला लँड आँफ स्माईल.असे म्हटले जाते.
14) टीन थायलंडमध्ये सर्वाधिक आढळून येणारे खनिजद्रव्य आहे आहे ,तर थायलंडमधून मोठ्या प्रमाणात निर्यात होणारे पीक म्हणजे तांदूळ होय.थायलंडमधील आहारात मोठ्या प्रमाणात तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश होतो.
15) रेड बुल संपूर्ण जगभरात पिले जाणारे एनर्जी ड्रिंक मुळात थायलंडमध्ये बनवले गेले आहे व नंतर पाश्चात्य राष्ट्रांच्या चवीसोबत जुळवून घेण्यासाठी त्याच्या मूळ चवीमध्ये बदल करण्यात आले.
16) थायलंड येथे मोठ्या संख्येने द्विप अस्तित्वात आहेत.द्विपांसाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडमध्ये साधारण 1430 द्विप अस्तित्वात आहेत.यापैकी बहुतांश हाँलिवूड चित्रपटांमध्ये दाखवली गेलेली आहे यामुळे याठिकाणी द्विप बघण्यासाठी पर्यटकांची संख्या लक्षणीय असते.
17) थायलँड मधील लोपबुरी भागामध्ये दरवर्षी माकडांच्या मेजवानीचा एक उत्सव भरवला जातो.या उत्सवा द्वारे या भागांमध्ये पर्यटकांचे आकर्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या माकडांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते .या माकडांसाठी मांस,फळे  आईस्क्रीम यांची मेजवानी दिली जाते.

18) थायलँड मध्ये सापांच्या विविध प्रजाती आढळून येतात व जास्तीत जास्त लांबीच्या अजगरांसाठी थायलंड प्रसिद्ध आहे आत्तापर्यंत सर्वात जास्त लांबीचा सापडलेला अजगर हा तेहतीस फुट इतका होता.
29) थायलंड ची राजधानी असलेल्या बँकाँक मध्ये वायू प्रदूषणाची पातळी इतकी जास्त प्रमाणात आहे की तेथील ट्रॅफिक पोलिसांना दररोज या प्रदूषणापासून वाचण्यासाठी फेस मास्कचा वापर करावा लागतो.
20) थायलंडच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत त्यापैकीच एक विश्वविक्रम म्हणजे एप्रिल 2010 मध्ये सर्वात जास्त लांब प्लेट असलेली रांग बनवण्याचा विक्रम थायलंडने केला होता. या प्लेटच्या लांब रांगेमध्ये दहा हजार 488 प्लेटचा समावेश होता. मात्र 2011साली भारताने हा विश्वविक्रम मोडीत काढला व  या सर्वाधिक लांबी च्या प्लेटच्या रांगेत 15200 धुतलेल्या प्लेट होत्या.याव्यतिरिक्त थायलंडमध्ये सर्वात मोठा सोन्याच्या बुद्धाची मूर्ती ,सर्वात मोठे मगरींचे फार्म, सर्वात लांब निलंबन पूल व सर्वात मोठे रेस्टॉरंट यांसारखे विक्रम सुद्धा थायलंडच्या नावावर आहेत.

21) थायलंडमधील बहुसंख्य लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करत असले तरीही आज सुद्धा थायलंडमध्ये राम आणि विष्णूचे पूजन केले जाते .थायलंडमधील राजघराणे हे स्वतःला रामाचे पुत्र कुश यांचा वारस मानते ।थायलंड राष्ट्रीय ग्रंथ राम केयन म्हणजेच थायलंडमधील रामायणाची आवृत्ती होय.
22) थायलँड वेश्याव्यवसायासाठी प्रसिद्ध असले तरीही याठिकाणी वेश्याव्यवसाय कायदेशीररीत्या अवैध मानला जातो. मात्र गरीबीमुळे व बेरोजगारी मुळे अनेक तरुण .तरुणी या व्यवसायाकडे ओढले गेले आहेत.