Home » अरविंद केजरीवाल यांची घोषणा, ‘आप’चं सरकार येताच महिलांना दरमहा १००० तर बेरोजगारांना ५०००…  
News

अरविंद केजरीवाल यांची घोषणा, ‘आप’चं सरकार येताच महिलांना दरमहा १००० तर बेरोजगारांना ५०००…  

पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यासाठी नेत्यांमध्येही आश्वासने आणि दाव्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काशीपूरला पोहोचले.जिथे त्यांनी पुन्हा एकदा रोजगाराची मुहूर्तमेढ रोवली आहे.अरविंद केजरीवाल यांनी बेरोजगारांना सरकारी नोकरी मिळेपर्यंत ५००० रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे.

उत्तराखंडमध्ये आमचे सरकार आल्यास तरुणांना रोजगार देऊ,असे केजरीवाल काशीपूरमध्ये म्हणाले.आम्ही दिल्लीत १० लाख नोकऱ्या दिल्या आहेत.मी दिल्लीत जे केले,तेच वचन मी येथे देत आहे.जोपर्यंत बेरोजगारांना सरकारी नोकरी मिळत नाही,तोपर्यंत बेरोजगारांना दरमहा ५००० रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार आहे.

सीएम केजरीवाल म्हणाले की,१८ वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा १००० रुपये दिले जातील.त्यानंतर पत्नीला पतीसमोर,मुलीला वडिलांसमोर,आईला मुलासमोर हात पसरण्याची गरज भासणार नाही.जर एका कुटुंबात एका पेक्षा जास्त महिला असतील तर त्या सर्वाना आमचे सरकार दरमहा १ हजार रुपये देतील.