Home » घरात ‘या’ ठिकाणी तुरटी ठेवल्यास पैश्याची समस्या होईल दूर, कसे ते जाणून घ्या
News

घरात ‘या’ ठिकाणी तुरटी ठेवल्यास पैश्याची समस्या होईल दूर, कसे ते जाणून घ्या

 आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्यांचे आपल्याला खुप फायदे असतात मात्र त्यांच्या वापराबद्दल आपण अनभिज्ञ असतो. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर तुरटी होय. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी किंवा जखम झाली असता निर्जंतुक करण्यासाठी तुरटीचा वापर सर्वसाधारणपणे केला जातो.तुरटीमध्ये ऑंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.दातांची स्वच्छता राखण्यासाठी तुरटी चा वापर केला जातो. तसेच घामाचा दुर्गंध घालवण्यासाठी सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवली जाते. आरोग्यविषयक फायद्यां सोबतच तुरटी चा वापर हा घरातील सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा केला जातो.बऱ्याचदा या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा मानले जाते मात्र वास्तुशास्त्रामध्ये तुरटीचा वापर करणे हे अतिशय भाग्यशाली व शुभ मानले जाते. तुरटी चा वापर आपल्या घरातील समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी कशा प्रकारे केला जातो हे आज आपण पाहणार आहोत.

पैसा जगातील सर्वात महत्त्वपूर्ण गरज मानली जाते.पैशाशिवाय कोणतीही गोष्ट सध्या शक्य होत नाही .मात्र अनेकदा आपल्यासमोर  पैशाविषयीच्या अडचणी निर्माण होतात. अशावेळी तुरटी हा खूप चांगला उपाय मानला जातो. ज्यामुळे आपल्या वास्तूमध्ये पैसा येण्यापासून रोखता येत नाही. घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुरटी ठेवली असता किंवा तुरटी फिरवलेल्या पाण्याने अंघोळ केली असता सर्व संकट व दोष दूर होऊन आपल्याला धनलाभ होतो. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळ्या कपड्यामध्ये तुरटी गुंडाळून ठेवली असता किंवा तुमचे एखादे दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर अशा ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळ्या कपड्यामध्ये तुरटी बांधून ठेवली असता सर्व बाजूंनी पैसा येण्यास प्रारंभ होतो. ज्या ठिकाणी पैसा अडकलेला असेल तिथूनही आपली देणे फेडले जातात.

डोक्यावर कर्ज असेल तर कर्जदाराला कर्ज फेडण्याच्या भीतीने चैन पडत नाही. या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी तीन बुधवारी एक उपाय करण्यास सुचवला जातो.विड्याच्या पानावर कुंकू आणि तुरटी ठेवून दोऱ्याच्या मदतीने हे पान गुंडाळावे आणि तीन बुधवारी पिंपळाच्या झाडाजवळ हे पान वाहावे यामुळे आपले कर्ज फेडण्यास साहाय्य मिळते असे सांगितले जाते.

नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी तुरटी हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. आपल्या घरामध्ये संचार करत असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्यासाठी बाथरूमच्या कोपऱ्यामध्ये एका वाटीत तुरटीचा खडा ठेवावा. या खड्याद्वारे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते असे मानतात.

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घराच्या रचनेचे काही नियम आणि दिशा सांगितलेल्या असतात.वास्तू रचनेमध्ये काही दोष असेल तर त्याचे परिणाम त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सहन करावे लागतात म्हणूनच अशा काही वास्तू दोष असलेल्या वास्तू मध्ये प्रत्येक खोलीत तुरटीचा खडा ठेवावा यामुळे वास्तु मधील दोष दूर होतो व घरात सुख शांती निर्माण होते.

एखाद्या व्यक्तीची वाईट नजर दूर करण्यासाठी तुरटीचा खडा जाळल्याने या वाईट नजरे चे परिणाम नाहीसे होतात. अनेकदा रात्री बेरात्री वाईट स्वप्न, भयानक स्वप्न पडतात व आपली झोपमोड होते तसेच भीती सुद्धा खूप वाटते.अशा वाईट स्वप्न पासून वाचण्यासाठी काळ्या कापडामध्ये तुरटीचा खडा गुंडाळून तो रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवला असता अशी वाईट स्वप्ने पडत नाहीत.

एका घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये भांडणे असतील गैरसमज असतील तर घरातील शांतता भंग पावते. अशा घरांमध्ये कधीही शांती व समृद्धी नांदत नाही.घरातील  व्यक्तींमध्ये भांडणे दूर व्हावीत व त्यांच्यामध्ये संबंध प्रेमाचे व्हावेत यासाठी रात्री झोपण्याच्या वेळी आपल्या झोपण्याच्या खोलीत पाण्याचा एक जग भरून ठेवा व त्यामध्ये तुरटीचा एक खडा टाकावा यामुळे घरातील जे काही वाद आहेत ते निश्चितच दूर होतात असे मानले जाते.

काही वास्तू या स्मशानभूमी सारख्या ठिकाणी बांधलेल्या असतात किंवा एखादी जागा काही वाईट घटनांची साक्षीदार असते. अशा ठिकाणी बांधलेल्या वास्तू मध्ये बऱ्याचदा अशांतता नांदते.या वस्तू मधील दोष दूर करण्यासाठी एका काचेच्या प्लेटमध्ये तुरटी चे तुकडे ठेवा.तुरटीची प्लेट घराच्या बाल्कनी मध्ये ठेवावी यामुळे वास्तुमधील जे काही वाईट दोष असतात ते निघून जातात..