News

मोठी बातमी! महाराष्ट्रात बर्ड फ्लू चा शिरकाव; परभणीतील 800 कोंबड्या बर्ड फ्लू ने मृत्युमुखी!

देशभरात बर्ड फ्ल्यूने थैमान घातलेले असताना आता महाराष्ट्रात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. देशातील सात ते आठ राज्यांमध्ये बर्ड फ्लू फैलावत आहे तर महाराष्ट्रातील परभणी मध्ये 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

परभणीतील मुरुंबा या गावी 8000 कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहे. त्यातील 800 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे परीक्षण करण्यासाठी नमुने भोपाळला पाठवण्यात आले. त्यातून त्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सर्व पाळीव पक्षांना आणि कोंबड्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर परिसरातील दहा किलोमीटर अंतरावर कोंबड्यांची वाहतूक बंद करण्याचे देखील आदेश माननीय जिल्हाधिकारी मुंगळीकर यांनी दिले आहेत.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. या तातडीच्या बैठकीत बर्ड फ्लूचा महाराष्ट्रात झालेला शिरकाव आणि आता रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.