Home » इजिप्तमध्ये सापडले ४५०० वर्षा पूर्वीचे जुने सूर्य मंदिर, पाहा आश्चर्य चकित करणारे फोटो…!
News

इजिप्तमध्ये सापडले ४५०० वर्षा पूर्वीचे जुने सूर्य मंदिर, पाहा आश्चर्य चकित करणारे फोटो…!

पिरॅमिडसाठी प्रसिद्ध असलेल्या इजिप्तमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना अनेकदा आश्चर्यकारक गोष्टी आढळतात. आता पुरातत्वशास्त्रज्ञांनी अशी दुर्मिळ वस्तू शोधून काढली आहे, जी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांना वाळवंटात गाडलेले 4,500 वर्षे जुने सूर्यमंदिर सापडले आहे. वाळवंटात खाणकाम करताना हे सूर्यमंदिर सापडले आहे. त्याचवेळी या शोधानंतर पुरातत्व शास्त्रज्ञ तपास करत आहेत की, त्यावेळी इजिप्तच्या वाळवंटात पूजा केली जात होती का?

पुरातत्वशास्त्रज्ञांना इजिप्तची राजधानी कैरोजवळील अबू गोराब शहरात हे जुने सूर्यमंदिर सापडले आहे. तसेच, पुरातत्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे सूर्यमंदिर सुमारे 4500 वर्षे जुने आहे आणि ते बरऱ्याच काळापासून वाळवंटात पुरले होते. आता या शोधाचे वर्णन पुरातत्वशास्त्रज्ञांचा गेल्या काही दशकांतील सर्वात मोठा शोध म्हणून केला जात आहे.

इजिप्शियन पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात की सुमारे 4500 वर्षांपूर्वी हे सूर्य मंदिर इजिप्शियन फारोने बांधले होते. हे सूर्यमंदिर ख्रिस्तपूर्व २५ व्या शतकात बांधले गेले असावे. पुरातत्वशास्त्रज्ञांना तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, सूर्य मंदिराचा पाया मातीच्या विटांनी बनवला होता, यावरून या जागेवर पूर्वीपासून एक इमारत असल्याचे दिसून येते.

दुसरीकडे, या मंदिराजवळ राजाचे अंतिम विश्रामस्थान म्हणून पिरॅमिड बांधण्यात आले होते जेणेकरून मृ’त्यू’नंतर राजा पुन्हा देवाची प्रतिमा बनून जगासमोर जगू शकेल. पुरातत्व शास्त्रज्ञांना तपासात असेही समजले की हे मंदिर मातीच्या विटांनी बांधले गेले होते, ज्याचा दोन फूट खोल पाया चुनखडीचा होता.

या संदर्भात इजिप्तोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मासिमिलानो नुझोलो यांनी सांगितले की, नुसिरीने बांधलेल्या अबू गोराबच्या वाळवंटात जमिनीखाली काहीतरी लपले आहे, अशी कल्पना आम्हाला खूप दिवसांपासून होती. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण कधी शोध घेऊ याची आम्हाला कल्पना नव्हती. आमच्याकडे आता इजिप्तच्या सूर्यमंदिरांच्या कथा सांगण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे ते म्हणाले.