News

पोलीस भरती बाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!

पोलीस दलामध्ये कार्यरत होण्याचे अनेक जण स्वप्न बाळगतात. आपल्या आयुष्यात करिअर महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, करीयरला देशसेवेची जोड देऊन अनेक जण पोलिस दलात किंवा सैन्यात भरती होतात.

अशाच अनेक तरुणांची स्वप्न गेली तीन वर्षे याच भरतीची वाट बघत होती. पोलीस दलात 12,500 जागांसाठी भरती होणार आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिषेक वंजारी, याबरोबरच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची एक संयुक्त बैठक झाली.

या बैठकीमध्ये तीन टप्प्यात भरती होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यामध्ये 12500 जागा भरल्या जाणार आहेत आणि गरज पडल्यास चार महिन्याच्या आत 20 हजार जागा भरल्या जाणार आहेत.

गृहमंत्र्यांनी केलेल्या मोठ्या घोषणेमुळे अनेक तरुणांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे, ज्या तरुणांना पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांनी तयारीला लागण्याची गरज आहे.