Home » पुन्हा महागाई चा भडका;पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले,पाहा आजचे दर…
News

पुन्हा महागाई चा भडका;पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले,पाहा आजचे दर…

देशातील पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनाच्या किंमती आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती २०१४ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत.जागतिक बेंचमार्क ब्रेंट $ ८१ प्रति बॅरल पार करत आहे.ज्यामुळे देशभरात इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलवरील महागाई थांबत नाही.

सरकारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांच्या ताज्या अपडेटनुसार, पेट्रोलच्या किंमतीत आज (बुधवारी) म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी प्रतिलिटर ३० पैसे आणि डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. यासह, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर १०२.९४ रुपये प्रति लीटर आणि मुंबईत १०८.९६ रुपये प्रति लीटरच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. डिझेलची किंमत दिल्लीमध्ये ९१.४२ रुपये प्रति लीटर आणि मुंबईत ९९.१७ रुपये प्रति लीटरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहराचे नाव पेट्रोल    डिझेल

दिल्ली    102.94   91.42

मुंबई       108.96   99.17

कोलकाता    103.65   94.53

चेन्नई                100.49   95.93

स्थानिक करांवरून अवलंबून राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात.ऑक्टोबरमध्ये एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत पेट्रोलच्या किंमतीत झालेली ही पाचवी दरवाढ आहे.२४ सप्टेंबरपासून आत्तापर्यंत डिझेलच्या किमतीत प्रति लिटर २.८ रुपयांनी वाढ झाली आहे.तर २८ सप्टेंबरपासून पेट्रोल १ रुपये ८० पैशांनी महाग झाले आहे.या महिन्यात आतापर्यंत फक्त एक दिवस (४ ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारामधील क्रूडच्या किंमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात.तेल विपणन कंपन्या दररोज किंमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात.भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करत असतात.