Home » ज्या गायकामुळे ‘ऋतिक रोशनला’ प्रसिद्धी मिळाली ‘त्या’ प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ५४ व्या वर्षी नि’ध’न, ऋतिक रोशन झाला भावुक…!
News

ज्या गायकामुळे ‘ऋतिक रोशनला’ प्रसिद्धी मिळाली ‘त्या’ प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ५४ व्या वर्षी नि’ध’न, ऋतिक रोशन झाला भावुक…!

गायक तरसेम सिंग सैनी, ज्यांना ताज म्हणूनही ओळखले जाते, ज्यांनी गल्ला गोरियां, इट्स मॅजिक – इट्स मॅजिक आणि थोडा दारू विच प्यार मिला दे यांसारखी सुपरहिट गाणी गायली, यांचे शुक्रवारी नि’ध’न झाले. ते 54 वर्षांचे होते. ताज गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होता. रिपोर्ट्सनुसार, सैनी यांच्या यकृताने काम करणे बंद केले होते आणि ते कोमात गेले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंगरला हर्नियाचा त्रास होता पण को’रो’ना व्हायरसमुळे त्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. विशेष म्हणजे, ताज प्यार हो गया, गल्ला गोरियां, इंट मॅजिक – इट्स मॅजिक, नाचेंगे सारी रात या गाण्यांसाठी ओळखला जात होता. ताजचे हे गाणे त्यांच्या काळात खूप गाजले होते.

ताज हे क्रॉस कल्चरल फ्यूजन म्युझिक बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. स्वत:चा अल्बम बनवण्यासोबतच त्यांनी ‘कोई मिल गया’, ‘रेस’ आणि ‘तुम बिन’ या चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. या वर्षी 23 मार्च रोजी, ताजच्या बँड स्टिरिओ नेशनने त्यांच्या प्रकृतीबद्दल एक अपडेट शेअर केला आणि सांगितले की ताजची प्रकृती सुधारत आहे आणि ते कोमातूनही बाहेर आले आहेत. तथापि, अखेरीस, ताजने आजारपणाची दीर्घ लढाई गमावली.