News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठीच्या पूर्व परीक्षांच्या तारखा अखेर घोषित!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अखेर विविध पदांसाठी घेण्यात येणार्‍या पूर्व परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षा आधी मराठा आरक्षणामुळे आणि नंतर लॉक डाऊन मुळे लांबणीवर पडल्या होत्या. 2021 मध्ये या परीक्षा कधी होतील हे मोठे प्रश्नचिन्ह उमेदवारांसमोर होते. आता त्याचे उत्तर एमपीएससीने स्वतः जाहीर नामा देत दिले आहे. परीक्षांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे:

  1. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आधी 11 ऑक्टोबर 2020 ला होणार होती. आता ती 4 मार्च 2021 ला होणार आहे.

2. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 ला होणार होती. आता ती 27 मार्च 2021 रोजी होणार आहे.

3. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब साठीची एकत्रित पूर्वपरीक्षा 22 नोव्हेंबर 2020 ला होणार होती. ही परीक्षा आता 11 एप्रिल 2021 रोजी होईल असे एमपीएससी कडून सांगण्यात आले आहे.