Featured Health More

टाचांना भेगा पडल्या आहेत ? एक आठवडा करा हे उपाय आणि मिळवा मुलायम टाचा

टीव्हीवरील जाहिराती या ग्राहकांची बरोबर समस्या ओळखून गेल्या जातात. त्यामुळे त्या जाहिराती लवकर प्रसिद्ध होतात. आपल्याला देखील त्या अगदीच जवळच्या वाटतात सौन्दर्यप्रधाने आणि त्याच्या जाहिराती या टीव्हीवरील मूळ विषय असतो. यातील एक जाहिरात आपले सर्वाधिक लक्ष वेधून घेते. पायांना पडलेल्या भेगा. या गोष्टीच्या जाहिराती तुम्ही पहिल्या तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये जवळपास सर्वाधिक स्त्रियांनाच या गोष्टीचा त्रास होतो. त्यांच्या तुलनेत पुरुषांना कमी त्रास होतो.टाचांना भेगा पडणे या विषयी अनेक गैरसमज आहेत. परंतु आपल्याला त्याचे मूळ कारण माहीत नसते ,जसे की टाचांना भेगा पडणे या मागे तुमच्या शरीरात देखील काही कमतरता असू शकता. जसे की कॅल्शियम वगैरे. आपण आज या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत. टाचांना भेगा पडण्या मागेचे कारण आणि योग्य उपाय.

टाचांना भेगा का पडतात – टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शिअम आणि स्निग्धतेची कमतरता होय. पायाची त्वचा जाड असते. त्यामुळे शरीरात तयार होणारे सिबम (तेल) पायाच्या बाहेरच्या भागांपर्यंत पोहचत नाही. शिवाय पौष्टिक घटक व योग्य स्निग्धता न मिळाल्यामुळे टाचा खडबडीत होतात. व त्यावर भेगा पडू लागतात. टाचांच्या भेगांमुळे आग होणे, दुखणे हा त्रास होतो. शिवाय कधीकधी त्यातून रक्तही येते.हिवाळ्यामध्ये थंडीचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या पायांवर. त्वचा कोरडी होते आणि फाटायला सुरुवात होते. जर तुम्ही यामध्ये स्वतःची काळजी घेतली नाही तर तुमच्या पायाला पडलेल्या भेगांचं रूपांतर हे सूज आणि त्रास अधिक वाढण्यामध्ये होतं. त्यामुळे पायांना भेगा पडल्या तर त्याची वेळीच काळजी घ्यायला हवी. \
थंडीत सर्वाधिक भेगा का पडतात – पायामधील तेलाच्या ग्रंथीमधील तेल निघून जातं आणि त्वचा कोरडी पडू लागते. थंडीच्या दिवसात ही त्वचा अधिक कोरडी होऊ लागते. त्यामुळे थंडी असो वा उष्मा. दोन्ही वेळा आपली पायाची त्वचा आपण मॉईस्चराईज करणं अत्यंत गरजेचं आहे.

दीड चमचा व्हॅसलीन व एक लहान चमचा बोरीक पावडर चांगल्या प्रकारे कालवा व भेगांवर हा जाड लेप लावा. काही दिवसातच फुटलेल्या टाचा भरू लागतील.रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पाय कोमट पाण्यात 5-10 मिनिट्स बुडवून ठेवा. पाण्यामध्ये थोडंसा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर तुम्ही पायांना प्युमिक स्टोनने स्क्रब करा आणि मग धुवा. यामुळे तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येतोखोबऱ्यामध्ये अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. खोबरेले तेल सूज व इन्फेक्शन कमी करते. टाचांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलानं मसाज करा. जर कोरडेपणा अधिक असेल तर सकाळ सध्यांकाळ पायांना मसाज करा.

तिळाचं तेलात नैसर्गिकरित्या मॉइश्चराइजर असते. जर तुमच्या टाचांना अधिक भेगा पडल्या असतील आणि त्यामुळं अनेक वेदना होतात. म्हणूनच झोपायच्या आधी रोज तिळाच्या तेलानं मसाज करा. तिळाच्या तेलात अँटी फंगल गुणधर्म आहेत. यामुळं पायाची डेडस्कीन काढण्यास मदत होणार आहेत.कोमट पाण्यात थोडा शाम्पू व एक चमचा सोडा आणि काही थेंब डेटॉल टाका. त्या पाण्यात १० मिनिटे पाय बुडवून ठेवा. त्वचा मऊ झाल्यावर मिथिलेटेड स्पिरिट लावून टाचांना प्युमिक स्टोनने किंवा मऊसर घासणीने घासून तिथली त्वचा साफ करा. त्यामुळे टाचेवरील माती निघून जाईल. नंतर टॉवेलने पुसून कोमट तेलाने मालिश करा

पॅडिक्यूअर एक सोपा प्रकार आहे. त्याला आपण घरी सुध्दा करू शकतो. पण पायाची अवस्था जास्तच खराब असल्यास पॅडीक्युअर चांगल्या ब्यूटी स्पेशालिस्टकडून करून घेणे चांगले.पॅडिक्यूअरसाठी साहित्य: छोटा टब, कोमट पाणी, शाम्पू, हायड्रोजन पेरॉक्साईड, नेलपॉलीश, रिमूव्हर, नेलकटर, ऑरेंज स्टीक, क्यूटीकल पुशर, नेल फायलर, प्यूमिक स्टोन, कोल्ड क्रिम, कापूस व टॉवेल.पहिल्यांदा नेलपेंट रिमूव्हरने पायावरची जुनी नेलपेंट काढा. नेलकटर किंवा छोट्या कात्रीने वाढलेली किंवा वाकडी झालेली नखे कापा. पायाची नखे नेहमी सरळच कापावीत. नेलफायलरने नखांना चांगला आकार द्यावा.

टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शाम्पू व एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड टाकून मिसळा किंवा कोमट पाण्यात 3 चमचे मीठ, अर्धा लिंबाचा रस, व एक छोटा चमचा गुलाबपाणी टाकून मिक्स करा. त्यात पाय 5-10 मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे मृत त्वचा ओलसर होते. 8-10 मिनिटानंतर प्यूमिक स्टोन किंवा घासणीने (नरम) घासून घाण साफ करा. पायापासून मळ निघाल्यावर स्वच्छ टॉवेलने पाय पुसा. त्यानंतर पायाच्या नखांवर क्रिम लावून चांगल्या‍ र‍ितीने मालीश करा. मालीश केल्यावर ऑरेंज स्टिकवर थोडा कापूस लावून नखाच्या आतला मळ साफ करा. क्युटीकल पुशरच्या सहाय्याने नखाच्या जवळचा भाग आतल्या बाजूला ढकला. त्यामुळे नखाचा आकार चांगला दिसू लागेल.
पायांवर कोल्ड क्रिमने 10-15 मिनिटे मालीश करा. त्यामुळे पायाची त्वचा मुलायम होईल. कापसाच्या बोळ्यानी नखे व त्वचेवरचे क्रिम पुसून टाका. पॅडिक्यूअर नंतर पायांना धुळ, घाणीपासून वाचवा.