National News Politician Politics

भारताच्या राफेलला चीनचे उत्तर :हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता विकसित, J15 लढाऊ विमान सज्ज

j15
j15

भारताला फ्रान्सने पाच राफेल विमानांची पहिली तुकडी दिल्यानंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि चीनकडे लागले आहे. भारताने राफेल विमाने खरेदी केल्यानंतर आता चीन देखील आपल्या हवाई दलाच्या भात्यात नवीन विमाने आणि आधुनिक विमाने भरती करण्याच्या तयारीत आहे. कपटानं इतरांच्या जमिनी बळकावणारा चीन आणि जगभर कोरोना निर्यात करणारा सुद्धा चीन. या तिन्ही मुद्द्यांवरुन अख्खं जग चीनविरोधात गुद्द्याची भाषा करत आहे. म्हणूनच जर संयमाचा बांध फुटला तर चीन हा तिसऱ्या महायुद्धाचं कारण ठरेल. चीन हा नेहमी धोका देण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्र आहे. अनेक राष्ट्रांना कर्ज देऊन त्यांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचे स्वप्न चीन नेहमी पाहत असतो.

मात्र भारताने त्यांच्या या मानसुब्यांना कधीही यशस्वी होऊ दिलेले नाही. त्यामुळे आता जगात एकटा पडलेल्या चीनविरोधात अमेरिका कधीही युद्धाचा शंखनाद करु शकतो. याचीही जाणीव जिनपिंग यांना आहे. म्हणूनच चीन स्वतःच्या ताकदीमध्ये सुद्धा दिवसेंदिवस भर घालत आहे. आपल्या जीडीपीचा मोठा पैसा चीन सरकारने शस्त्र विकसित करण्यासाठी खुला केला आहे.त्याचाच परिणाम म्हणजे चीनने पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता विकसीत केली आहे. याचा अर्थ चीनची लढाऊ विमानं आता जमिनीवर न उतरता दिवसरात्र इतर देशांच्या वायूसेनेविरोधात लढू शकतात.चीनने आतापर्यंत इतर देशांच्या अनेक शस्त्रांची डिझाईन चोरी करुन ती स्वतःच्या नावानं मिरवली. मात्र, अंधारात हवेतल्या हवेत लढाऊ विमानांना इंधन भरण्याचं तंत्रज्ञान चीनकडे नव्हतं.

मात्र, नुकतंच चीननं नौदलाच्या J15 लढाऊ विमानाच्या सहाय्याने हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता यशस्वीपणे विकसीत केली.यासंदर्भातील एक नवीन व्हिडीओ चिनी मीडियाने प्रसारित केला आहे. मात्र चीनच्या या कामगिरीने भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे.चीनचं हे यश भारत आणि अमेरिकेसाठी चिंतेची गोष्ट आहे. कारण, आता चीनचं J15 फायटर प्लेन 24 तास आकाशात सज्ज असेल. आतापर्यंत जगात अमेरिकन नौदल आणि वायुदल हवेतल्या हवेत इंधन रिफील करण्यासाठी तरबेज मानली जातं होती. मात्र, आता त्या रांगेत चीन सुद्धा येऊन ऊभा राहिल्यामुळे अमेरिकेसाठी सुद्धा हे मोठं आव्हान मानलं जातं आहे.

J15 विमानाची ताकद
चीनच्या हवाई दलात हे सर्वाधिक खतरनाक लढाऊ विमान आहे. J15 विमानाला चिनी नौदल आणि वायुदलात फ्लाईंग शार्क म्हटलं जातं. या फायटर प्लेनमध्ये कोणत्याही तापमानात लढण्याची क्षमता आहे.एखाद्या लढाऊ विमानात रात्रीतून हवेतल्या हवेत इंधन भरणं मोठ्या जिकीरीचं काम मानलं जातं. पण त्यात यश मिळवल्यामुळे चीन आता येत्या काळात स्वतःच्या ताफ्यात J15 विमानांची संख्याही वाढवण्याची शक्यता आहे.या तंत्रज्ञानाचा दुसरा फायदा म्हणजे चिनी विमानं आता कमी इंधन भरुन जास्तीत-जास्त मिसाईल्स स्वतःसोबत घेऊन उडतील. कमी इंधनामुळे विमानांचं वजन कमी होतं. त्यामुळे त्यांची मारा करण्याची क्षमता ही जास्त अचूक बनते.

या यशस्वी प्रयोगांनंतर चीनने लगेच एकीकडे इंधन भरण्याची क्षमता विकसीत केल्यानंतर दुसरीकडे चीननं दीड महिन्यात पहिल्यांदाच दक्षिण चिनी समुद्रात युद्धसराव सुरु केला. समुद्रात उभे केलेले टार्गेट चिनी विमानांनी नष्ट केले.त्यामुळे आता अमेरिकेची देखील चिंता वाढणारी हि घटना आहे. चीनचा हा सराव म्हणजे अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ला करण्याची रंगीत तालीम होती. त्यामुळे आता चिनी विमानांना चितपट करण्यासाठी अमेरिकन नौदलालाही पूर्ण ताकदीनं मैदानात उतरावं लागणार आहे. त्यामुळे आता चीनच्या या कामगिरीवर अमेरिकेची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

About the author

Being Maharashtrian