बीएसएनएल’लाही घरघर; तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना देणार नारळ…!

0
153

नवी दिल्ली दि.०४-: सरकारी मालकीच्या भारत दूरसंचार प्राधिकरणावर म्हणजेच बीएसएनएलवर गंबीर आर्थिक अरिष्ट कोसळल्याची जाहीर कबुली या कंपनीच्या अध्यक्षांनी दिली आहे. वाढता तोटा सहन करण्यासाठी लवकरच बीएसएनएलच्या तब्बल 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीची किंवा स्वेच्छानिवृत्ती देणे भाग आहे असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

खुद्द सरकारची मालकी असलेली ही कंपनी मृत्यूशय्येवर असताना सरकार काही मदतीचा हात देणार काय, यावर कंपनीच्या वरिष्ठांकडे सध्या तरी उत्तर नाही. एका खासगी दूरसंचार कंपनीच्या प्रचंड आक्रमणासमोर अनेक खासगी दूरसंचार कंपन्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली असताना, सरकारचे पाठबळ असलेल्या बीएसएननेही गुढघे टेकल्याचे चित्र दिसत आहे.

मंत्री, खासदार, सनदी नोकरशहा आदींना फुकट सेवा देऊन देऊन व तद्दन सरकारी पध्दतीने कारभार हाकणाऱ्या बीएसएनएलची आर्थिक प्रकृती आधीच तोळामासा झाली आहे.