National News Sports

IPL दरम्यान ‘या’ खेळाडूच्या रूममध्ये राहायच्या खूप मुली! माजी सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

IPL
IPL

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली आयपीएल स्पर्धा लवकरच सुरु होणार आहे.कोरोनाच्या या संकटकाळात मार्चमध्ये होणारी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे संकट कमी होत असताना आयपीएलचे आयोजन देखील होणार आहे. १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलचे आयोजन होणार आहे. त्यामुळे अखेर क्रिकेट चाहत्यांना खुशखबर मिळाली असून ते याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र जितकी मोठी स्पर्धा असेल तितकेच मोठे वाद देखील यामध्ये होत असतात.

काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या 2013च्या हंगामाने साऱ्या जगाला हादरून सोडले होते. कारण आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे समोर आले होते.या स्पॉट फिक्सिंगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे तीन मोठे खेळाडू एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजीत चंदीला यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आता श्रीसंतचा बॅन संपणार असून श्रीसंत पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, आता राजस्थान रॉयल्सचा माजी क्रिकेटपटू आणि 2012 अंडर-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन खेळाडू गोलंदाज हरमीत सिंगने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

हरमीत सिंगने एका मुलाखतीत आयपीएल दरम्यान श्रीसंतच्या रुममध्ये खूप मुली यायच्या असा खुलासा केला. हरमीतने सांगितले की श्रीसंत रात्रंदिवस पार्टी करत असे आणि त्याच्या खोलीत मुलीही होत्या. 2013मध्ये जेव्हा श्रीसंतला अटक करण्यात आली तेव्हाही त्याच्या खोलीतून एक महिला असल्याचे दिसले होते.या प्रकरणी हरमीतने धक्कादायक खुलासा करत जेव्हा श्रीसंतला सकाळी व्यायामासाठी उठवायला जायचो तेव्हा तो पार्टी करत असायचा असे सांगितले.हरमीत सिंगने मुलाखतीत असेही सांगितले की, श्रीसंत इतकी पार्टी करायचा की त्याच्या हॉटेलचे बिल 2 ते 3 लाख रुपये असायचे. त्यामुळे आता इतक्या वर्षानंतर यामागील अनेक खुलासे समोर येत असून याचा श्रीसंतच्या कमबॅकवर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे.

दरम्यान, श्रीसंत सध्या कमबॅकचा प्रयत्न करत असून त्याने यासाठी तयारी आणि सर्व देखील सुरु केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेमध्ये तो आपले नाव देखील नोंदवणार आहे. मात्र त्याआधी त्याला केरळच्या रणजी संघामध्ये स्थान देखील मिळवायचे आहे. त्यामुळे त्याने लिलावात नाव दाखल केल्यानंतर त्याला कुणी खरेदीदार मिळतो कि नाही हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.