fbpx
Ola - being Maharashtrian

वयाच्या २५ व्या वर्षी उभी केली १००० करोड ची कंपनी

हि स्टोरी आहे एका अशा आईआईटी पासआऊट ची ज्याने मॅक्रोसॉफ्टची चांगल्या पोस्टची नोकरी सोडून OLA कंपनी स्थापित केली. विशेष म्हणजे हे की ज्यांच्या कारने 70 शहरांमध्ये लोक प्रवास करतात त्यांनी स्वतःसाठी एकसुद्धा कार खरेदी केली नाही.

आईआईटी मुंबईमध्ये कॉम्पुटर सायन्स व इंजिनयरिंग ग्राजुएट भाविष अग्रवालने 2010-11 मध्ये OLA कैब्सची स्थापना केली पण त्यावेळी घरच्यांनी व मित्रांनी त्यांना मूर्खात काढले. भाविष म्हणतात की त्यांची नेहमीच स्वतःच काही सुरु करण्याची इच्छा होती आणि त्यामध्ये समाजासाठी नवीन काय देऊ शकेलं याचा विचार ते करत असायचे.

त्यांना OLA कॅब काढण्याची युक्ती कशी सुचली या प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणतात की, एकदा एका ट्रीपला खाजगी गाडीने गेलो असता कार ड्राइवरने मधेच कार थांबून जास्त पैसे मागण्यास सुरवात केली. नाही म्हंटल्यावर प्रवास इथेच संपला असं म्हणत तो निघून गेला आणि त्यानंतर त्यांना बसने प्रवास करावा लागला. यावेळी त्यांना वाटलं की यासारख्या त्रासाचा सामना बहुसंख्य लोक करत आहे जे क्वालिटी कॅब सर्विसच्या शोधात आहे. त्यावेळी पहिल्यांदा भाविष ला कॅब बुकिंग सर्व्हिस मध्ये रस वाटू लागला.

आपल्या टेकॅनॉलॉजी बॅकग्राऊंडला घेऊन भाविषने कॅब सर्विस आणि टेकॅनॉलॉजीला सोबत जोडण्याचा विचार केला. ऑगस्ट 2010 मध्ये भाविषणे OLA कॅब सुरु करण्यासाठी आपली नोकरी सोडली आणि या वाटेवर काम करण्यास सुरुवात केली. यात भाविष चे मित्र अंकित भाटी हे नोव्हेंबर 2010 मध्ये त्याचे भागीदार बनले.

आपल्या आयडिया प्रति समर्पण भाविषच्या या कृतीवरून दिसतं कि त्यांनी व त्यांच्या पत्नीने कोणतीही पर्सनल व्हेइकल घेणार नाही असा प्रण घेतला आहे कि जेणे करून येण्या-जाण्यासाठी ते OLA कॅब चा वापर करतील.