Home » चुकूनही ‘ही’ झाडे घराजवळ लावू नका,होऊ शकते मोठे नुकसान…
Spiritual

चुकूनही ‘ही’ झाडे घराजवळ लावू नका,होऊ शकते मोठे नुकसान…

आपल्या घरामध्ये झाडे प्रत्येकालाच आवडतात.अनेक जण आपल्या घरामध्ये होम गार्डन बनवतात.घरातील बागेला सुंदर व सुशोभित करण्यासाठी विविध प्रकारची रोपे व झाडे लावली जातात.वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा घरामध्ये झाडे लावण्याचे फायदे सांगितले आले आहेत,मात्र प्रत्येकच झाड हे आपल्या वास्तुसाठी शुभ नसते.काही झाडे लावणे हे वास्तूसाठी अशुभ असते.अशी अशुभ प्रकारात मोडणारी झाडे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये दुःखाचा वावर सुरू होतो व संकटे एकामागून एक आपला पिच्छा पुरवू लागतात.आज आपण जाणून घेणार आहोत अशी कोणती झाडे आहेत जी लावल्यामुळे आपल्या वास्तूला संकटाला सामोरे जावे लागू शकते.वास्तूशास्त्रामध्येसुद्धा पुढील झाडांना घरामध्ये लावणे हे अशुभ मानले जाते.

१) चिंचेचे झाड :- चिंच खाणे हे महिलांना व लहान मुलांना सुद्धा आवडते. चिंच खाण्यासाठी अगदी घरा मध्ये उपलब्ध व्हावे म्हणून काही महिला आपल्या घरामध्ये चिंचेचे रोप लावतात. मात्र हे चिंचेचे रोप आपल्याला धोकादायक ठरू शकते. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा चिंचेचे झाड घराजवळ किंवा घरामध्ये लावू नये असे सांगितले आहे.कारण या झाडामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात आकर्षिली जाते. चिंचेचे झाड लावायचे असेल तरीही ते घराच्या अगदी जवळ न लावता लांब व एखाद्या सार्वजनिक ठिकाणी लावावे. चिंचेचे झाड शक्यतो मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी लावावे असे सांगितले जाते.

२) लिंबू :- आवळा आणि लिंबू या फळांचे आपल्या शरीरास खूप फायदे आहेत.या दोन्हीही पदार्थांमधून आपल्या शरीरात क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते म्हणून ही झाडे खूप उपयुक्त आहेत.मात्र ही झाडे घराजवळ किंवा मुख्य दाराजवळ लावणे अशुभ मानले जाते. लिंबाच्या झाडाला काटे असतात व या काट्यांचा प्रभाव घरातील नातेसंबंधावर पडतो असे सांगितले जाते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये अनेक मतभेद निर्माण होतात. घरामधील शांतता भंग होते म्हणून ही झाडे शक्यतो घराच्या आत मध्ये किंवा मुख्य दाराजवळ लावू नये.

३) कपाशीचे झाड :- कापसाचे झाड घराच्या आत मध्ये लावू नये. हे झाड लावल्यामुळे दुर्भाग्य आपल्याला आयुष्यात कधीही सोडत नाही. कापसाचे झाड लावल्यामुळे घरामध्ये आर्थिक तंगी निर्माण होते व पैसा विनाकारण खर्च होतो. पैशांचा अपव्यय होतो व उत्पन्नाची साधने बंद होतात.

४) बाभळीचे झाड :- बाभळीचे झाड घराजवळ किंवा घराच्या आसपासही लावले जाणे हे खूप अशुभ असते.या झाडाला खूप मोठे काटे असतात.त्यामुळे घरात अशांती निर्माण होते.नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.घरातील सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. घरातील सदस्यांमध्ये मानसिक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात.

५) मेहंदी चे झाड :- घराजवळ किंवा घराच्या आसपास सुद्धा मेंदीचे झाड न लावण्यास सांगितले जाते. मेहंदी च्या झाडावर येणाऱ्या सुगंधामुळे वाईट आत्मे या झाडाकडे आकर्षिली जातात असे सांगितले जाते व यामुळे सुखासमाधानाने नांदत असलेली आयुष्य सुद्धा दुःखात परावर्तित होतात. हे झाड शक्यतो घराच्या जवळ लावू नये.

६) बोन्साय :- सध्याच्या काळामध्ये बोन्साय झाडे घरामध्ये ठेवण्याचा ट्रेंड वाढत आहे. मात्र ही झाडे घरामध्ये ठेवणे हे अशुभ असते.या झाडांमुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते.