Home » आसाम मधील ‘या’ मंदिरात चक्क करतात ‘योनीची’ पूजा, जाणून घ्या यामागील रहस्यमय इतिहास…!
Spiritual

आसाम मधील ‘या’ मंदिरात चक्क करतात ‘योनीची’ पूजा, जाणून घ्या यामागील रहस्यमय इतिहास…!

भारताला देवी-देवतांचा आणि मंदिरांचा देश मानला जातो. भारतामधील मंदिरांची रचना या मंदिरामधील देवी-देवतांच्या इतिहास हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण आहे. भारतातील या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी देशातील भक्तांप्रमाणेच परदेशातील भक्त आणि पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. भारतातील अशी काही मंदिरे आहेत त्यांच्या मागील इतिहास हा सुद्धा एक न उलगडलेले रहस्य मानला जातो.

असेच एक मंदिर आहे ज्यामधून रक्ताची नदी वाहते असे सांगितले जाते व या मंदिरातील देवीच्या योनीचे दर्शन घेण्यासाठी लांबून भक्त येतात. हे मंदिर म्हणजेच आसाम मधील कामाख्या मंदिर होय. कामाख्या मंदिराची अनेकविध वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे हे मंदिर एक रहस्य बनून राहिले आहे. आज कामाख्या मंदिरातील अशीच काही वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत.

बहुतांश लोकसंख्या आज सुद्धा स्त्रियांच्या शारीरिक समस्या आणि आणि मासिक पाळीसंबंधी विषयावर बोलणे निषिद्ध मानतात. मात्र कामाख्या मंदिर हे स्त्रियांच्या शरीराशी निगडित नैसर्गिक गोष्टीला अक्षरशः हा साजरे करणारे मंदिर मानले जाते. गुवाहाटीच्या नीलांचल टेकड्यावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. कामाख्या देवी ला रक्त स्त्रावणारी देवी मानले जाते. कामाख्या देवीच्या मंदिराच्या गर्भगृहात देवी शक्तीचे किंवा सतीचे योनी वसलेली आहे.

दरवर्षी जून महिन्यात देवीच्या मासिक पाळीच्या काळात योनिद्वारे रक्तस्राव होतो असे मानले जाते व या रक्तस्त्रावामुळे मंदिराच्या बाजूने वाहणारी  नदी ही लाल रंगाची बनते असे सांगितले जाते. भारतामध्ये पूजाअर्चा किंवा अन्य देवधर्माचे निगडित कार्याच्या वेळी मासिक पाळी आलेल्या स्त्रीला बाजूला बसवले जाते मात्र या उलट कामाख्या मंदिरामध्ये मासिक पाळी ही स्त्रीला प्रजननक्षमता प्राप्त करून देणारी शक्ती मानली जाऊन तिचे स्वागत केले जाते.

मासिक पाळी ही प्रत्येक मुलीला जन्म देण्याची शक्ती देणारी क्षमता आहे व क्षमता असलेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये कामाख्या देवी किंवा शक्तीचे वास्तव्य आहे असे या ठिकाणी मानले जाते. कामाख्या मंदिराचा  इतिहास सुद्धा अतिशय रंजक असा आहे. कामाख्या मंदिराचा इतिहास हा भगवान शिव आणि देवी सती यांच्याशी निगडित आहे.

त्यामध्ये असे सांगितले जाते की देवी सती आणि भगवान शिव यांच्यामध्ये देवी सतीच्या माहेरी पित्याने आयोजित केलेल्या यज्ञा वरून वाद झाले. देवी सती यांच्या पित्याने हा यज्ञ देवांना प्रसन्न करण्यासाठी आयोजित केला होता. मात्र याठिकाणी देवी सती आणि भगवान शिव यांना जाणून-बुजून आमंत्रण देण्यात आले नव्हते. यावर भगवान शिवांनी देवी सतीने यज्ञात न जाण्याविषयी सुचवले मात्र आपल्या पतीच्या सांगण्याला न जुमानता देवी सती आपल्या पित्याच्या यज्ञाला हजेरी लावण्यासाठी गेल्या आणि या ठिकाणी त्यांच्या पित्याने त्यांचा अपमान केला व व भगवान शिवाबद्दल ही अपशब्द काढले.

आपल्या पती बद्दलचे अपशब्द ऐकल्यानंतर देवी सतीने अपमानाने संतप्त होऊन त्या यज्ञ मध्येच स्वतःला आहुती दिली या ठिकाणी नक्की काय झाले हे जाणून घेण्यासाठी भगवान शिव आल्यानंतर देवी सती यज्ञामध्ये भस्म झालेले पाहून भगवान शिव यांचा क्रोध अनावर झाला व  त्यांनी तांडव करण्यास सुरुवात केली या संपूर्ण प्रकाराने साक्षात सर्व देवगण ही भयभीत झाले व सर्वत्र हाहाकार उडाला मात्र कोणालाही समजत नव्हते कि भगवान शिव यांचा क्रोध कसा थांबवावा.

यावर उपाय म्हणून श्रीविष्णूंनी आपल्या चक्रा द्वारे देवी सतीच्या शरीराला मोडले व यावेळी सर्व अवयव हे देशभरातील एकशे आठ ठिकाणी पसरलेले व यांनाच शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. देवी सती ह्यांच्या सर्वत्र पसरलेल्या अवयवां पैकी योनी आणि गर्भाशय ज्या ठिकाणी पडले तिथे कामाख्या मंदिर वसले आहे. याठिकाणी कामाख्या देवीला हे नाव प्रचलित होण्यामागे कामदेव यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे .एका शापामुळे जेव्हा कामदेव आपले पौरुषत्व गमावून बसले होते तेव्हा ते याठिकाणी आले होते व या ठिकाणी त्यांना पौरुषत्व पुन्हा प्राप्त करून दिले गेले.

जेव्हा कामाख्या देवी चा हा मासिक धर्म चालू असतो त्यावेळी तीन दिवस हे मंदिर बंद ठेवले जाते. मात्र त्या काळामध्ये या ठिकाणी ध्यानधारणेसाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक जवळपासच्या गुहांमध्ये त्यांचा देण्यासाठी गर्दी करत असतात. तसेच भाविक सुद्धा या काळामध्ये देवीच्या मासिकपाळीच्या रक्ताने माखलेल्या कापसाच्या प्रसाद म्हणून मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा करून थांबलेले सुद्धा दिसून येतात.