Home » परिवारातील कोणाचा मृ’त्यू झाल्यानंतर मुंडन का केले जाते? जाणून घ्या यामागील रहस्य !
Spiritual

परिवारातील कोणाचा मृ’त्यू झाल्यानंतर मुंडन का केले जाते? जाणून घ्या यामागील रहस्य !

सगळ्यांनी गरुड पुरणाविषयी ऐकलेच असेल.गरुड पुराण हे वैष्णव संप्रदायाशी संबंधित आहे.हिंदू धर्मामध्ये मृ’त्यूनंतर गरुड पुराण लावले जाते.भगवान विष्णू हे या पुराणाचे दैवत आहेत.गरुड पुराणाचे दोन भाग आहेत– पूर्वाखंड व उत्तराखंड.तसेच गरुड पुराणामध्ये स्वर्ग,नरक,पाप,पुण्य यापबद्द्ल माहिती दिलेली आहे.तसेच ज्ञान,विज्ञान,धोरण,नियम आणि धर्म याविषयी देखील सांगितले गेले आहे.

गरुड पुराणामध्ये मृ’त्यूचे गूढ आणि जीवनाचे रहस्य याविषयी माहिती दिलेली आहे.हिंदु धर्मातील लोक मृ’त्यूनंतर होण्याऱ्या पुनर्जन्मवरती देखील विश्वास ठेवतात,म्हणून व्यक्तीच्या मृ’त्यूनंतर हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा आणि परंपरा पार पाडतात अपल्याला दिसून येते.यापैकीच एक म्हणजे,मृ’त्यूनंतर त्या व्यक्तीच्या मुलाचे आणि नातवाचे सर्व केस कापण्याची प्रथा आहे.यामागे असणारे धार्मिक महत्त्व गरुड पुराणात सांगितलेले आहे.

गरुड पुराणामध्ये,माणसाच्या जन्मापासून ते मृ’त्यूपर्यंत सर्व काही गोष्टी अगदी खोलवर सांगितलेल्या आहे.गरुड पुराणानुसार,जर मृ’त्यूनंतर सर्व प्रकारच्या अत्यंविधी व्यवस्थित पार पाडल्या तर त्या आत्माला पुनर्जन्म मिळतो.यापैकीच एक प्रथा म्हणजे मृ’त्यू झाल्यावर परिवारातीमधील लोकांचे पूर्ण केस कापले जातात.

यामध्ये त्यांच्या डोक्याचे आणि चेहऱ्यावरील पूर्ण केस कापले जाते.गरूड पुरणानुसार,या मागील पाहिले कारण म्हणजे, स्वच्छता.कारण व्यक्तीच्या मृ’त्यूनंतर त्याच्या देहाला संक्रमण होत असल्याने,सर्व देहाकडे जीवजंतू आकर्षित होतात.परिवारातील लोक तसेच नातेवाईक हे,सर्व प्रकियेदरम्यान त्या मृत शरीराजवळलच असतात तेव्हा ते संसर्ग जंतु त्याच्या शरीरावर येण्याची शक्यता असते.

त्यामुळे अंतिम संस्कार झाल्यानंतर केस,नखे कापण्याची आणि आंघोळ करायची प्रथा आहे.ज्यामुळे आपले शरीर स्वच्छ राहते.त्यामुळे मुंडन केल्यास सर्व प्रकारच्या संक्रमणापासून आपले शरीर दूर राहते.

आणि मुंडन करण्यामागे आणखी दुसरे कारण म्हणजे मृत व्यक्तीबद्दल असणारी श्रद्धा आणि सन्मान.कारण मुंडन करणे म्हणजे मृत व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त करणे ही प्रथा असल्याचे सांगितले जाते.तसेच असे देखील म्हणतात असे केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला संतुष्टी त्यामुळ मुक्ती मिळण्यास मदत होते.

असे देखील सांगितले जाते की,मृ’त्यूनंतर काही वेळ  परिवारात अशुद्धी आणि अपवित्रता असते.त्यामुळे मुंडन केल्यामुळे यापासून मुक्ती मिळते.यामुळे परिवारामध्ये १३ दिवश याचे पालन करावे लागते.

गरूड पुरणानुसार,मृतव्यक्तीचा आत्मा मृ’त्यू लवकर मान्य करत नाही,अगोदर आत्मा मृतदेहाच्या आसपास भटकत असतो,नंतर सर्व क्रिया पूर्ण झाल्यावर,परिवाराच्या अवतीभोवती भटकत असतो.त्यामुळे मृत आ’त्म्याला मुक्ती मिळण्यासाठी आणि परिवाराच्या सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठी मुंडन केले जाते.