Home » जाणुन घेऊया नाकात नथ घालण्यामागचे वैज्ञानिक कारण…
Spiritual

जाणुन घेऊया नाकात नथ घालण्यामागचे वैज्ञानिक कारण…

कपाळावरील बिंदीपासून पायांमध्ये परिधान केलेले ज़ोडव्यापर्यंत सोळा शृंगार आहे.प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व असते.परंपरेच्या दृष्टीकोनातून त्यांचे महत्त्व रोचक आहे.भारत हा एक अशा देश आहे जिथे वेगवेगळ्या धर्मातील लोक राहतात.या धर्मांमध्ये अनेक प्रथा व परंपरा आहेत. विशेषत: हिंदू धर्मात.हिंदू धर्म हा असा धर्म आहे की जिथे कोणतेही शुभ कार्य असो किंवा विशेष प्रसंग किंवा पाहुणचार प्रत्येक गोष्टीची वेगळी प्रथा आहे.

परंतु काही रीती रिवाजामुळे आपल्या आरोग्याला आणि शरीराला किती फायदा होतो हे आपल्याला माहिती आहे का? त्याचबरोबर त्याचा आपल्या मनावरही मोठा परिणाम होतो.हिंदू धर्मात एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे स्त्रीयांचे सोळा शृंगार.जे जगभर प्रसिद्ध आहे.या सोळा शृंगारामध्ये, कपाळाच्या बिंदीपासून पायांवर परिधान केलेले जोडव्यापर्यंत.प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व असते.परंपरेच्या दृष्टीकोनातून त्यांचे महत्त्व रोचक आहे.नाकात नथ घालण्या मागे कोणते वैज्ञानिक कारण आहे ते जाणून घेऊया…

आजच्या युगाबद्दल सांगताना नाकात घालणाऱ्या नथेला इंग्रजीमध्ये नोज रिंग असे म्हणतात.ती आज फॅशनमध्ये आघाडीवर आहे.नाकातील नथेला सर्व धर्मांच्या स्त्रिया परिधान करतात.हिंदू धर्मातील महिलांसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे.हे विवाहित स्त्रियांसाठी नशीबाचे लक्षण देखील मानले जाते.ही नाथनी केवळ आजच्या युगातीलच नव्हे तर राजे आणि सम्राटांच्या काळातसुद्धा परिधान केली जात असे.जे आजही चालू आहेत.नाकात घातलेल्या नथ घालण्या मागील वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊया…

नथ घालण्या मागचे काही कारणे आज आपण जाणुन घेणार आहोत…

१) आयुर्वेदानुसार नाकामध्ये नथ घातल्यामुळे डाव्या नासिकेतून जाणाऱ्या रक्तवाहिन्या गर्भाशयाशी जोडलेल्या असतात यामुळे स्त्रियांना बाळंतपनाच्या वेळी जास्त त्रास होत नाही.

२) विज्ञानाच्या म्हणण्यानुसार नाक आणि कान टोचल्यामुळे नाकामध्ये घातलेल्या धातु मुळे आपल्याला वाताचा त्रास जाणवत नाही.

३) नाकामध्ये सोन्याची नथ घातल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.उष्णता कमी झाल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम, हातांची कातडे निघणे,पाय उलने इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

४) मानसिक आरोग्यावर उपयुक्त ठरते ज्या स्त्रीचे नाक टोचलेले असते स्त्री खंबीर आणि मजबूत मनाची असते असे म्हंटले जाते.

५) तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार नाकात नथ घातल्यामुळे कानाच्या आणि श्वासना संबंधित असणारे विकार होत नाहीत तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.असे खुप सारे फायदे आहेत.

६) नाकात नथ घातल्यामुळे शांत झोप लागते तसेच नथामुळे नाकपुडी संबंधित असणाऱ्या आजारांपासून वाचता येते.तसेच कफ सर्दी बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांसोबत लढण्याची ताकद मिळते.

७) नाकात नथ घातल्यामुळे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती मिळते आणि डोकेदुःखी पासून देखील अराम मिळतो.