Home » विराट कोहली ने ‘या’ कारणामुळे दिला कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा…
Sports

विराट कोहली ने ‘या’ कारणामुळे दिला कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा…

भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याने शनिवारी ट्विटरवर कसोटी सामन्यांच्या कर्णधार पदाचा तो राजीनामा देत असल्याची घोषणा केली तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.आता पर्यंतच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहली याने नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 2-1असा पराभव झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

कसोटी सामन्यांच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिकृतपणे क्रिकेट सामन्यांच्या तीनही प्रकारांच्या कर्णधार पदाची विराटची इनिंग संपुष्टात आली आहे.याअगोदर 2021 साली आइसीसी टी20 वर्ल्ड कप नंतर कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा विराटने केली होती.त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट ला एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या कर्णधार पदावरून काढून टाकले होते व त्याच्या जागी रोहित शर्माची वर्णी लागली होती.

ज्यावेळी विराट कोहलीने टी 20 सामन्यांच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर एकदिवसीय सामन्यांचे कर्णधार पद भूषविण्याची विराट ची इच्छा होती मात्र त्याला अवघ्या काही तास अगोदर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या कर्णधार पदावरून हटविण्यात आल्याचे कळवले असे विराटचे म्हणणे होते.मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण स्वतः विराट सोबत याविषयी चर्चा केली होती असे सांगितले.या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याचे लक्षात आले होते.

विराट ने आपल्या राजीनामा जाहीर करण्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की गेली सात वर्षे पूर्ण ऊर्जेने आपण भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधार पद भूषविले आहे.प्रत्येक वेळी आपण 120 टक्के प्रयत्न करुन खेळलो आहोत.मात्र प्रत्येक गोष्टीच्या थांबण्याची योग्य वेळ असते.विराट कोहली हा कसोटी क्रिकेट सामन्यांचा आतापर्यंत चा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

About the author

Being Maharashtrian