सध्याच्या काळामध्ये एखादा लग्नसमारंभ असो किंवा बॉलीवूडमधील एखादा पुरस्कार सोहळा फॅशन हा सर्व सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरतो सर्व सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध डिझायनर्स कडून आपले कपडे डिझाइन करून घेतात जेणेकरून त्यांचे स्वतःचे एक वेगळे स्टाइल स्टेटमेंट बनेल.
या ट्रेन्डमुळे विविध फॅशन डिझायनरना एक व्यासपीठ मिळत आहे व ते स्वतःचा ब्रांड बनवण्यात ही यशस्वी ठरले आहेत. अनिता डोंगरे हे फॅशन जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे.आज अनिता डोंगरे या एक स्वतंत्र ब्रांडच्या मालक आहेत व मोठमोठे सेलिब्रिटी त्यांच्या कामाचे चाहते आहेत.
इथपर्यंतचा अनिता डोंगरे यांचा प्रवास सुकर निश्चितच नव्हता.पारंपारिक सिंधी कुटुंबात अनिता यांचा जन्म झाला.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपल्याला फॅशन डिझायनर व्हायचे आहे असे ठरवले होते. ही कला त्यांना आईकडून मिळाली होती. मात्र सुरुवातीला त्यांना नोकरी करण्यासाठी खूप विरोध झाला मात्र आईवडिलांनी पाठिंबा दिला व त्यांनी आपल्या बहिणीसोबत फॅशन क्षेत्रात पाऊल टाकले .
सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप संघर्ष केला.केवळ दोन शिलाई मशिनच्या जोरावर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. भाड्याच्या दुकानात ऑफिस थाटले मात्र अनेकदा भाड्याचे पैसे न दिल्याने त्यांना दुकान खाली करण्यास सांगितले गेले. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत न खचता त्यांनी नोकरदार महिलांना डोळ्यांसमोर ठेवून कपडे तयार केले.
मात्र अशा वेगळ्या कपड्यांना दूकानात ठेवण्यासाठी नकार मिळू लागला.शेवटी त्यांनी आपला स्वतःचा ब्रांड बनवण्याचा निश्चय केला व तो पूर्ण केला. आज अनिता डोंगरे यांच्या नावाभोवती खास वलय आहे.त्या आठशे कोटींच्या व्यवसायाच्या मालक आहेत. अनेट पुरस्कार त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवले आहे.