Home » १० वी पास असणाऱ्या आजोबांनी बनवली पाण्यावर चालणारी सायकल,पूरग्रस्तांसाठी ठरले वरदान… 
Success

१० वी पास असणाऱ्या आजोबांनी बनवली पाण्यावर चालणारी सायकल,पूरग्रस्तांसाठी ठरले वरदान… 

फक्त शिकलेले लोकच भन्नाट कामं करू शकतात असे अशी पण अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात जी कमी शिकलेली असतांना सुद्धा नवीन शोध लावतात आणि आपले नाव प्रसिद्ध करतात.म्हणजे एखादा शोध लावायचा म्हंटल तर त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी शिकाव्या लागतात.

पण एका दहावी पास असणाऱ्या आजोबांन एक भन्नाट शोध लावला आहे.तर आज आपण त्यांनी लावलेल्या संशोधनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

आज आपण जी कथा बघणार आहोत ती आहे बिहारच्या एका वृद्ध व्यक्तीची.त्यांचे जीवनात ध्येय आहे ते म्हणजे सामान्य लोकांची मदत.६० वर्षाचे सैदुल्ला यांचे शिक्षण १० वी पर्यंत झालेले आहे.त्यांनी लावलेल्या शोधामुळे त्यांना देशात एक नवीन ओळख मिळाली आहे.

पाण्यावर चालणारी सायकल बनवून त्यांनी देशामध्ये वाह-वाह मिळवली आहे.पूरग्रस्त भागातील लोकांना यामुळे खूप मदत झाली आहे.२००५ मध्ये सैदुल्ला यांना यासाठी राष्ट्रीय ग्रासरूट इनोव्हेशन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांना नवीन गोष्टी बनवण्याची खुप आवड आहे.आजकाल ते नवीन शोधात आहे ते म्हणजे फिरणारा पंखा.या पंख्याच्या निर्मितीमुळे पंख्या जवळ बसणाऱ्या व्यक्तींना समान हवा मिळेल.

४५ वर्षपूर्वीची गोष्ट आहे १९७५ ची जेव्हा बिहारमध्ये पूर आला होता.सलग तीन आठवडे पूर तसाच होता.तेव्हा त्यांनी नदी ओलांडण्यासाठी बोटला सायकलला जोडली होती तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की आपण अशी सायकल बनवू जी पाण्यावर आरामात चालू शकेल.

तेव्हा त्यांनी पुराच्या पाण्यात अशी सायकल बनवली ही सायकल बनवल्यामुळे पुराच्या वेळेस खूप जणांचे प्राण वाचले.पुराच्या वेळेस त्यांनी खूप जणांची मदत केली होती.ही सायकल बनवण्यासाठी ४ आयताकृती फ्लोट्स सायकल ला जोडले ज्यामुळे सायकल तरंगण्यास मदत होते आणि तसेच सायकलच्या मागच्या बाजूने २ फॅन ब्लेड जोडल्या ज्यामुळे सायकल पाण्यावर चालू शकते आणि जमिनीवर पण.

सायकल व्यवस्थित चालते का नाही हे पाहण्यासाठी त्यांनी पहलघाट ते महेंद्रघाट गंगा ओलांडली.यासाठी त्यांना ६००० रुपये खर्च आला होता.त्यांनी ही सायकल फक्त तीन दिवसांमध्ये बनवली होती.सायकल पाण्यामध्ये तरंगावी यासाठी त्यांनी एक आयताकृती हवा फ्लोट लावला होता

काही दिवसानंतर सैदुल्ला यांनी कमी खर्च लागावा यासाठी काही बदल केले त्यामुळे ही सायकल आता फक्त ३००० रुपयात तयार करू शकतो.त्यांनी अजूनही काही संशोधन केलेले आहे.जसे की पाण्यावर चालणारी सायकल,वॉटर पंप,मिनी ट्रॅक्टर,चारा कट करणारी मशीन त्यांनी असे शोध लावले ज्यामुळे सामान्य माणसाला मदत मिळेल.

त्यांनी केलेल्या संशोधनाला त्यांनी त्यांच्या पत्नीचे नाव दिले आहे.सैदुल्ला यांचे लग्न १९६० मध्ये झाले.त्यांच्या पत्नीचे नाव नूरजहाँ आहे.नूर सायकल,नूर वॉटर पंप,नूर मिनी ट्रॅक्टर अशी त्यांनी केलेल्या संधोधनाची नावे आहेत.

सैदुल्ला यांचे गजपुरा येथेच त्यांचे शिक्षण झाले.हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण करता आले नाही.सैदुल्ला हे आता पंक्चर काढण्याचे काम करतात.यामधून मिळणारे पैसे ते परत नविन शोधासाठी खर्च करतात.