Home » “लिज्जत पापडचा” ८० रुपयापासून ते करोडोचा प्रवास…!
Success

“लिज्जत पापडचा” ८० रुपयापासून ते करोडोचा प्रवास…!

जसवंती बेन एके दिवशी आपल्या शेजारणींसोबत गप्पा मारत बसल्या होत्या.गप्पा मारत असताना या सर्वांच्या मनात पापडाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आला मात्र पापडाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल त्यांच्याकडे नव्हते. आवश्यक भांडवल मिळवण्यासाठी या महिला त्या भागातील प्रसिद्ध समाजसेवक छगनलाल करमशी पारेख यांच्या कडे गेल्या.

लिज्जत पापड हे नाव सर्वाना परिचित आहे.या नावाची ओळख ही घरोघरी जेवणाची लज्जत वाढवण्यात आहे. लिज्जत  उद्योग समूह हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे याचे कारण म्हणजे लिज्जत उद्योग समूहाचे संस्थापक जसवंती बेन यांना नुकतेच राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.जसवंतीबेन यांनी  श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड ची स्थापना केली.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड ची सुरुवात केवळ ऐंशी रुपयांच्या भांडवलात झाली असून या उद्योगाचे मूल्य सोळाशे कोटी रुपये इतके आहे यावरुन उद्योगाच्या यशस्वीतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो.लिज्जत उद्योग समूह संपूर्ण देशात 81 शाखा असून तब्बल 45 हजार कर्मचाऱ्यांना या उद्योगाने रोज गार दिला आहे या सर्व कारणांमुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने करण्यात आले.

15 मार्च 1959 हा तो दिवस ज्या दिवशी लिज्जत पापड ची स्थापना करण्याचा विचार जसवंती बेन यांच्या मनात आला. गिरगाव येथील त्याच्या घरामध्येच आपल्या शेजारणींसोबत गप्पा मारत असल्यावर पापड विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांच्या मनात आले मात्र त्या वेळी आवश्यक असलेले भांडवल त्यांच्याकडे नव्हते. त्या भागातील प्रसिद्ध समाजसेवक छगनलाल करमशी पारेख यांच्या कडे गेल्यावर त्यांनी या महिलांना 80 रुपये मदत केली‌ या मदतीच्या जोरावर त्यांनी सुरुवातीला चार संच असलेल्या पापड पॅकचा व्यवसाय सुरू केला.

हा व्यवसाय 80 रुपये भांडवलापासेन सुरू करण्यात आलेला आहे. आपल्या घरापासून सुरू केलेला लिज्जत पापड या व्यवसायाने सध्या भारतातील प्रत्येक कोपरा मध्ये आपली शाखा उघडली आहे. भारतामध्ये या व्यवसायाच्या एकूण 81 शाखा असून  भारताबाहेर सुद्धा अमेरिका सिंगापूर आणि या ठिकाणी लिज्जत पापडाची विक्री केली जाते.या व्यवसायामध्ये 4500 महिला कार्यरत आहेत.

या महिला केवळ पापड बनवण्याचे काम करत नाही तर या महिला  व्यवसायामध्ये सहमालक या तत्वावर काम करतात .सुरुवातीच्या काळामध्ये जसवंतीबेन व त्यांच्या मैत्रिणींना व्यवसायाच्या वृद्धीची फारशी माहिती नव्हती मात्र तरी देखील आज लिज्जत पापड हा एक ब्रँड बनला आहे यावरुन महिला सक्षमीकरणाचा अंदाज येतो. लिज्जत पापड हा उद्योग समूह केवळ पापड बनवण्याकरता मर्यादित राहिला नाही तर लिज्जत पापड उद्योग समूहाने डिटर्जंट पावडर,पीठ ही उत्पादने बाजारात आणली.

लिज्जत हा उद्योग समूह हा गेली अनेक वर्षे आपल्या भारतीय जेवणाची लज्जत वाढवत आहे मात्र उद्योग समूहाला सुद्धा काही वेळा अपयशाचा सामना करावा लागला .लिज्जतउद्योगसमूहाने चामड्याच्या वस्तू बनवण्याचे हे काम हाती घेतले होते मात्र यामध्ये तोटा झाल्यामुळे हा उद्योग बंद करावा लागला अशाप्रकारे सर्व क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करू पाहणाऱ्या उद्योग समूहाच्या संस्थापिका जसवंतीबेन जमनादास  यांना त्यांच्या कार्याची दखल घेत पद्मश्री पुरस्कार मिळाला हे अगदी यथार्थ आहे.