Home » लाखों लोकांना प्रेरित करणारा संदीप माहेश्वरी एकेकाळी करायचा ‘हे’ काम, ऐकून विश्वास बसणार नाही..!
Success

लाखों लोकांना प्रेरित करणारा संदीप माहेश्वरी एकेकाळी करायचा ‘हे’ काम, ऐकून विश्वास बसणार नाही..!

संदीप माहेश्वरी हे नाव माहित नसलेली व्यक्ती अगदी विरळी. संदीप माहेश्वरी हे युट्युब वर लाखोंनी फॉलोवर्स असलेले एक प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. या व्यतिरिक्त ते एक उत्तम छायाचित्रकार व व्यावसायिक सुद्धा आहेत. संदीप माहेश्वरी यांच्या प्रेरणादायी व्हिडिओज मुळे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवा पिढीला नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. संदीप माहेश्वरी यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी मिळवलेल्या आहेत.

संदीप माहेश्वरी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाचा एल्युमिनिअमचा व्यवसाय होता व या व्यवसायात तोटा झाल्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळली. संदीप यांनी कुटुंबाला हातभार लावला व मार्केटिंग क्षेत्रात काम केले. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना मॉडेलिंगच्या संधी मिळाल्या.

मात्र या क्षेत्रात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. संदीप माहेश्वरी यांनी छायाचित्रांचे प्रशिक्षण घेतले व मॉडेल म्हणून नशीब आजमावू पाहणा-या तरुणांना पोर्टफोलिओ बनवून देणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीचे नाव होते माश ऑडिओ व्हिज्युअल प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीनंतर संदिप यांनी इमेजबझार.कॉम ची स्थापना केली.

ही कंपनी भारतातील सर्वात जास्त छायाचित्रे संग्रह असलेली कंपनी आहे व केवळ भारतातच नव्हे तर बाहेरील देशात ही या छायाचित्रांचा वापर केला जातो. या कंपनीची स्थापना केली तेव्हा संदिप यांचे वय अवघे २६ वर्षे होते. संदीप माहेश्वरी यांना २०१३ साली इंडियन एंट्रयूप्रेन्युअर समिटमध्ये क्रिएटिव्ह एन्ट्रयुप्रेन्युअर हा सन्मान देण्यात आला.

संदिप यांची खरी ओळख त्यांच्या यू ट्यूब चॅनलमुळे मिळाली. आपले अनुभव, संघर्ष ते या माध्यमातून शेअर करतात व जगण्याची उमेद देतात. भुवन बाम, आशिष चंचलानी यांच्या बरोबरीने आज संदीप माहेश्वरीचे चॅनल फॉलो केले जाते.