Home » एकेकाळी डोंगरावर म्हशी चारणारी ही मुलगी आज आहे IAS अधिकारी…!
Success

एकेकाळी डोंगरावर म्हशी चारणारी ही मुलगी आज आहे IAS अधिकारी…!

जगभरातील नागरी सेवा परीक्षांपैकी काही सर्वाधिक कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होय अर्थातच यूपीएससी. दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण-तरुणी अधिकारी बनण्याची स्वप्न डोळ्यात घेऊन ही परीक्षा देत असतात. मात्र यांपैकी खूप कमी परीक्षार्थी या परीक्षेच्या सर्वच टप्पयांवर उत्तीर्ण होतात.

यूपीएससी पास होण्यासाठी मेहनत ,परिश्रम आणि सातत्य हे गुण आवश्यक असतात. काही परीक्षार्थींना अगदी लहानपणापासूनच आर्थिक दृष्ट्या या परीक्षेसाठी पाठबळ मिळालेले असते मात्र काही परीक्षार्थी हे अतिशय दुर्गम भागातून कठीण परिस्थितीमध्ये अभ्यास करून ही परीक्षा पास झालेले असतात.

अशाच एक अधिकारी म्हणजे सी वनमती होय. सी वनमती या आयएएस अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. सी वनमती यांचे वडील हे केरळमध्ये चालक म्हणून काम करत होते व लहानपणी आपल्या कुटुंबीयांसोबत वनमती कुटुंबाला मदत म्हणून गुरांना राखण्याचे काम करत असत.

सुरुवातीपासूनच वनमती यांना अभ्यासामध्ये गती होती व म्हणूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना भरपूर अभ्यास करण्यासाठी व शिक्षणाचे सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते ही वनमती यांनी या स्वातंत्र्याचा व संधीचा योग्य तो उपयोग करून घेत 2015 साली आपल्या दुसऱ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.

पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आले मात्र या अपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्दीने पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली. या प्रयत्नामध्ये मुलाखतीच्या अगोदर त्यांच्या वडिलांची तब्येत अचानक गंभीर झाली. मात्र या परिस्थितीतही त्यांनी आपली मुलाखत पूर्ण केली.

त्या आपल्या वडिलांना  आपल्या यशाचे श्रेय देतात कारण ज्यावेळी त्या विवाह योग्य झाल्या त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शिक्षणाऐवजी विवाह करण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांचे वडील यासाठी बधले नाहीत व वनमती यांना शिक्षणासाठी ते प्रोत्साहन देत राहिले. सी वनमती यांच्यासारख्या कठीण व प्रतिकूल परिस्थितीमध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे भावी पिढीसाठी निश्चितच आदर्श आहे.