Home » पारंपरिक पद्धतीने पाककृती बनवून ‘हे’ शेतकरी ठरले यूट्यूबवर अत्यंत लोकप्रिय…!
Success

पारंपरिक पद्धतीने पाककृती बनवून ‘हे’ शेतकरी ठरले यूट्यूबवर अत्यंत लोकप्रिय…!

यू ट्यूब हे आधुनिक काळामध्ये केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून ज्ञान विज्ञान सोबतच ते उदरनिर्वाहाचे साधन सुद्धा बनत आहे. आपण युट्युब उघडले तर लक्षात येते की अनेक जण विविध प्रकारचा आशय  घेऊन स्वतःचे यूट्यूब चैनल तयार करत आहेत व या यूट्यूब चैनल वर प्रेक्षक सबस्क्राईब सुद्धा करतात.

या यूट्यूब चैनल च्या गर्दीमध्ये काही विशिष्ट चॅनेल मात्र खूपच खास आहे. असेच एक चॅनेल म्हणजे तमिळनाडूमधील काही शेतकऱ्यांनी मिळून बनवलेले विलेज पाककला हे यूट्यूब चैनल होय. शेतकरी म्हणजे एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते मात्र या शेतकऱ्यांनी आपल्या पेशा व्यतिरिक्त आपल्या आवडीलाही जोड व्यवसाय म्हणून वापरता येऊ शकते हेच उदाहरण निर्माण केले आहे.

तमिळनाडू राज्यातील पोककैट्टी‌ जिल्ह्यातील चिन्ना वीरमंगलम या गावातील सहा शेतकऱ्यांनी मिळून हे व्हिलेज पाक कला नावाचे यूट्यूब चैनल सुरू केले. ह्या शेतकऱ्यांना विविध पाककृती बनवण्याची आवड होती व यातूनच या चॅनल चा जन्म झाला. या चॅनलची खासियत म्हणजे या चॅनलवर केवळ पारंपारिक पाककृती दाखवल्या जातात व या चॅनलवर तमिळ भाषेतून पाककृती समजावल्या जातात.

हे चॅनल पूर्णपणे तमिळ भाषेतून असले तरीही चॅनलचे सबस्क्राईबर करोडोंच्या घरात आहेत व म्हणूनच नुकतेच या चॅनलला यूट्यूब कडून डायमंड बटनही मिळाले आहे. व्हिलेज पाककला हे यूट्यूब चैनल तमिळ भाषेत असले तरीही केवळ तमिळ भाषिकच नव्हे तर संपूर्ण जगभरात हे चॅनल पाहणारे लोक पसरलेले आहेत.

यामध्ये भारतातील प्रसिद्ध राजकारणी राहुल गांधींचा ही समावेश आहे. तमिळनाडूमधील निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधींनी चॅनेल मध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वादही घेतला. या चॅनल मधून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता काही वंचित घटकांना मदत करण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजेच शेतकरी हा खरंच लोकांना जगवणारा अन्नदाता आहे हे वेळोवेळी सिद्ध होते.