fbpx
bribr- bhastachari

‘हि’ आहेत देशातील सर्वात भ्रष्ट राज्ये : महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर, जाणून घ्या

भ्रष्टाचाराची समस्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक ठिकाणी काम करण्यासाठी आपल्याला लाचेच्या स्वरूपात काही विशिष्ट रक्कम किंवा वस्तू द्याव्या लागतात. यामुळे भारताचे नाव देखील मोठ्या प्रमाणात खराब झाले असून याचा फटका भारतातील सर्वच राज्यांना बसत आहे.

मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे देशभरात या राज्यांची बदनामी होत असून आज आपण देशभरातील सर्वात भ्रष्ट अशा पाच राज्यांवर नजर टाकणार आहोत.

या पाच राज्यांमध्ये होतो सर्वात जास्त भ्रष्टाचार

५) तेलंगणा
या यादीत पाचव्या क्रमांकावर तेलंगणा असून यामध्ये ६७ टक्के लोकांनी लाच दिल्याचे मान्य केले तर ५६ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिल्याचे मान्य केले आहे.

४) उत्तर प्रदेश
या यादीत चौथ्या क्रमांकावर उत्तरप्रदेश असून यामध्ये ७४ टक्के लोकांनी लाच दिल्याचे मान्य केले तर ५७ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिल्याचे मान्य केले आहे.

३) झारखंड
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झारखंड असून यामध्ये ७४ टक्के लोकांनी लाच दिल्याचे मान्य केले तर ७४ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिल्याचे मान्य केले आहे.

२) बिहार
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून यामध्ये ७५ टक्के लोकांनी लाच दिल्याचे मान्य केले तर ५० टक्के लोकांनी अनेकदा लाच दिल्याचे मान्य केले आहे.

१)राजस्थान
या यादीत पहिल्या क्रमांकावर राजस्थान असून यामध्ये ७८ टक्के लोकांनी लाच दिल्याचे मान्य केले तर २२ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिल्याचे मान्य केले आहे.