पावसाळ्यात कोणत्या धबधब्याला फिरायला जाल ?

[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]

पावसाळ्यात कोणत्या धबधब्याला फिरायला जाल ?

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.रांधा फॉल – सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरी जवळ असलेल्या विल्सन डॅम जवळ हा धबधबा आहे.

चिंचोटी धबधबा

चिंचोटी धबधबा
चिंचोटी धबधबा

पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड स्थानकापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोटी गावानजीकचा चिंचोटी धबधबा हे पावसाळी भटकंतीचे मुंबईकरांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण. बस आणि रिक्षाच्या सहज उपलब्धतेमुळे चिंचोटीला पोहोचणे सुकर झाले आहे. गावातूनच ओढय़ाच्या कडेकडेने जाणारी ठळक पायवाट तास-दीड तासात आपल्याला धबधब्याशी घेऊन जाते. वाटेतील जंगलातील हिरवाई पाहून मन उल्हासित झाल्याशिवाय राहात नाही. धबधब्याच्या पोटाशी असलेल्या डोहात पोहण्याची मजा काही औरच.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
पण जुलअखेपर्यंत येथील कातळावर शेवाळ साचल्याने सगळा परिसर निसरडा होतो. त्यामुळे येथे वावरताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा जोर वाढून प्रवाह धोकादायक होतो. अशा वेळी डोहात उतरण्याचा मोह टाळलेलाच बरा. धबधब्याच्या वरून जाणारी एक पायवाट जंगल तुडवीत तुंगारेश्वरकडे घेऊन जाते. ट्रेकिंगचा अनुभव असलेल्यांनी हा छोटासा ट्रेक आजमवायला काहीच हरकत नाही

तुंगारेश्वर धबधबा

तुंगारेश्वर धबधबा
तुंगारेश्वर धबधबा

तुंगारेश्वर अभयारण्याच्या घनदाट वनराईत आकंठ बुडालेल्या या शिवधामाला श्रावणमासी भाविकांची ही गर्दी लोटते. त्यात मंदिराशेजारून वाहणाऱ्या प्रवाहात ठीकठिकाणी निर्माण होणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा धबधब्यांची रेलचेल भिजऱ्या मनांना इथपर्यंत आणते. वसई रोड स्थानकापासून ७ किलोमीटर अंतरावरील तुंगारेश्वर फाटय़ापर्यंत शेअर रिक्षांची ये-जा सतत सुरू असते. पुढे चार किलोमीटर पायपीट करायची नसल्यास खासगी रिक्षा थेट गेटपर्यंत नेऊन सोडते.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
तेथून कच्च्या मातीच्या सडकेवरून जाताना दोन-तीन वेळा ओढा ओलांडताना पाय ओले करत तासाभरात आपण देवळापाशी पोहोचतो. आवारात पूजेच्या सामानाची दुकाने तसेच चहा-नाश्त्याच्या टपऱ्या दिसतात. या भागाचे विशिष्टय़ म्हणजे येथील जैवविविधता. जंगलाशी खऱ्या अर्थी एकरूप व्हायचे असेल तर येथे एखाद्या जाणकारासोबत जंगलात एक फेरफटका मारावाच. अनेक प्रजातींची फुलपाखरांनी जंगल समृद्ध आहे. ट्रेकिंगची हौस भागवायची असेल तर तुंगारेश्वर ते माथ्यावरील परशुराम कुंड असा छोटा सोपा ट्रेक करता येऊ शकतो

रांधा फॉल

रांधा फॉल
रांधा फॉल

सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय
नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.

पांडवकडा धबधबा

पांडवकडा धबधबा
पांडवकडा धबधबा

खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.

झेनिथ-धबधबा

झेनिथ-धबधबा
झेनिथ-धबधबा

खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.
मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

पळसदरी धबधबा

पळसदरी धबधबा
पळसदरी धबधबा

मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय येथे आहे. मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक गर्दी करतात.
जेवणाची सोय या ठिकाणी होते

गवळीदेव धबधबा

गवळीदेव धबधबा
गवळीदेव धबधबा

नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.

कोंडेश्वर –

कोंडेश्वर
कोंडेश्वर

बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना
पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.

भगीरथ धबधबा

भगीरथ धबधबा
भगीरथ धबधबा

वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.

टपालवाडी धबधबा

टपालवाडी धबधबा
टपालवाडी धबधबा

नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे
त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.

मोहिली धबधबा

मोहिली धबधबा
मोहिली धबधबा

कर्जतपासून ६ ते ७ किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
लोणावळ्याचे भुशी धरण,त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. इथून जवळच असलेला कोरीगड, तैलबैला,घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच
मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची, तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी
धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो.

भांडारदरा धबधबा

भांडारदरा धबधबा
भांडारदरा धबधबा

भंडारदरा हे नाशिकपासून ७० कि.मी. वर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. भंडारद-याचे खरे सौंदर्य हे पावसाळयानंतर अधिक खुलते, नाहीतर इतर वेळेला हा भाग अगदी रखरखीत असतो. १९२६ साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे. इथला ‘छत्री’ (umbrella) धबधबा हा अतिशय सुंदर व मनोहर आहे. भंडारद-यापासून ११ कि.मी. वर रंधा धबधबा आहे. हा धबधबा ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळतो.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
त्यामुळे हे दृश्य सुंदर असून सुध्दा भीतीदायक वाटते. हा धबधबा पाहण्याकरिता पर्यटकांसाठी सुरक्षित सोय केली आहे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांना भंडारद-यापासून कळसूबाई शिखर खूपच जवळ आहे. महाराष्ट्रातले उंच असणारे हे शिखर समुद्रसपाटी पासून १,६४६ मीटर उंच आहे. हा भाग दाट जंगल-झाडींनी वेढलेला आहे. विविध प्रकारचे वन्य प्राणी व पक्षी येथे सहजपणे आढळतात. रस्ता घनदाट जंगलातून जात असल्यामुळे गिर्यारोहकांनी स्थानिक वाटाडयांची अथवा पुस्तकांची मदत घेतलेली अधिक चांगली. जवळ अमृतेश्वर देऊळ आहे. येथे शंकराची पुरातन पिंड आहे. अमृतेश्वरला बोटीने जावे लागते. येथूनच पुढे रतनगड किल्ला आहे.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
हा किल्ला फारसा वैशिष्टयपूर्ण नसला तरी पर्यटकांसाठी भेट देण्याजोगा आहे. भंडारदऱ्यापासून २२ कि.मी. असणारे ‘घाटघर’ ठिकाण थरारक ड्रायव्हींगची आवड असणा-यासाठी योग्य आहे. पावसाळयात ह्या भागात संपूर्णत: धुके असते. तसेच घाटघर कडे जाणारा रस्ता खाचखळग्यातून जाणारा निमूळता रस्ता आहे. त्यामुळे चालक रस्ता चुकण्याची शक्यता अधिक आहे.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
भंडारदरा येथे महाराष्ट्र पर्यटक मंडळाने राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय केली आहे. मंडळाची रहाण्याची सोय तळयाकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. राहण्याची सोय दूरध्वनी (६२८१६९, ६२६८६७) वरून होऊ शकते. आता काही खाजगी हॉटेल्सची सोय सुध्दा उपलब्ध आहे. भंडारदारा येथे तुम्हाला उच्चप्रतीची राहण्याखाण्याची सोय कदाचित मिळणार नाही पण निसर्गाचा आनंद मात्र मनमुराद लुटता येईल.

कुणे धबधबा

कुणे धबधबा
कुणे धबधबा

महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील धबधबा आहे. तीन टप्प्यांत २०० मीटर कोसळणारा हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी १४व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पैकी सगळ्यात उंच टप्पा १०० मीटर चा आहे.

पेब धबधबा

पेब धबधबा
पेब धबधबा

पनवेलच्या ईशान्येला, मुंबई – पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन – चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला (विकटगड) आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत.

सोलानपाड़ा धबधबा

सोलानपाड़ा धबधबा
सोलानपाड़ा धबधबा

कर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वरील सोलानपाडा डॅम वर बनविण्यात आलेला हां धबधबा अतिशय सुरक्षित तितकाच् सुंदरआहे.लहान मुलाना देखील निर्धोक पणे पाण्यात डुंबण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
सह कुटुंब एक दिवसाची पावसाळी सहल करायची असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे.स्वतः ची गाडी नसेल तर नेरळ स्टेशन वरून दर पंधरा मिनिटांनी कशेळे पर्यंत जाणाऱ्या आणि कशेळे येथून जांबरुग् कड़े जाणाऱ्या मिनीडोअर रिक्षाने येथे सहज पोहचता येते.त्या ठिकाणी गेल्या नंतर आणि तेथील
सृष्टि सौंदर्य पाहिल्या नंतर येथून परत फिरायला मनच होत नाही.

माळशेज घाट

माळशेज घाट
माळशेज घाट

या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो.पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे.

खोपीवली गावातून दिसणारा माळशेज घाट आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर – कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

ठोसेघर धबधबा

ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या पावसामुळे उशिरा वाहतो. परंतु सन २०११ मध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचे तांडवनृत्य जरा लवकरच सुरू झाले होते. त्यामुळे त्यावर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या धबधब्याचा जलौघ पाहण्यासाठी ठोसेघरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली होती.ठेथुन
[wpna_ad placement_id=”452401262333876_452412225666113″]
ठोसेघर धबधबा हा धबधबा तारळी नदीवर आहे. धबधब्याच्या जवळचे गांव ठोसेघर आहे.शेजारील दुसरे मोठे गाव चाळकेवाडी आहे. Chalkewadi पासुन पुढे गेल्यवर ओवानचक्की बघण्यासाठी जाऊ शकतो, जाण्यासाठी रेल्वेने महाराष्ट्रातल्या सातारा स्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गांवी पोहोचावे.

भिवपुरी-

भिवपुरी
भिवपुरी

हे सध्याचे हॉट पिकनिक स्पॉट ठरत आहे. मुंबईपासून एकंदप हाकेच्या अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाण तरुणांसाठी पर्वणी ठरत आहे. माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण सध्या नव्याने उद्यास येणारे पिकनिक स्पॉट ठरत आहे. कसे पोहचायचे : मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्टेशनवर उतरुन हा ठिकाणी जाता येते. नेरळच्या नंतर भिवपुरी हे स्थानक येते.

स्टेशन उतरल्यानंतर जवळपास ३० मिनिटांचे अंतर पार केल्यानंतर आपण या निर्सगरम्य ठिकाणी पोहचतो. जेवण्याची व्यवस्था : याठिकाणी धबधब्याजवळ जेवणाची कोणतीही व्यवस्था नाही. परंतु खाली स्थानकाजवळ हॉटेल्स आहेत किंवा येथील गावकर्‍यांना सांगितले तर ते जवणाची व्यवस्था करुन देताता.