Travel

सौंदर्याने नटलेले राजस्थानचे वैभव ‘ बुंदी ‘!

भटकंती हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. भारतामध्ये अनेक निसर्गरम्य स्थळ आहेत ज्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. तुम्हाला फिरायला जायची आवड असेल तर; दुसर्‍या देशाकडे बघण्याआधी भारत हा विविधतेने आणि स्वयंपूर्ण तिने नटलेला आहे. त्यामुळे, भारतातल्या विविध शहरांची माहिती असल्यास भारतातच पर्यटन करणे अतिशय उल्हासदायी आहे.

राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची यादी समोर येते. मात्र राजस्थानी इथेच संपत नाही. राजस्थान मधील नयनरम्य ठिकाण म्हणजे बुंदी!

अरवली पर्वत रांगा… पर्वतरांगांच्या मधोमध वसलेलं आकर्षित करणार बुंदी… आपल्याला स्वतःकडे खेचून घेते! राजस्थान म्हणलं की, मोठमोठे राजवाडे सुंदर असे किल्ले आणि महाल, वास्तुशास्त्रीय दृष्ट्या देखणं असं राजस्थान आपल्या डोळ्यासमोर येतं! मात्र बुंदी हे याहून वेगळं आहे.

बुंदी हे खरंतर खास करून चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. ज्या लोकांना कलेची आवड आहे त्यांना अतिशय प्राचीन चित्रकलेचा इतिहास असलेले बुंदी अवश्य आवडेल! चित्रकलेचा इतिहास प्राचीन आहेच त्याचबरोबर वैविध्यपूर्ण आणि सुंदरशा चित्रकृती देखील अगदी आवडीने जपलेल्या आहेत.

बुंदी चित्रकलेसाठी प्रसिद्ध! म्हणजे तिथे किल्ले नाहीत असं नाही. बुंदी मध्ये किल्ले देखील आहेत आणि तिथला एक किल्ला अतिशय प्रसिद्ध आहे. हा किल्ला दोन भागांमध्ये विभागून वरचा भाग म्हणजे तारागड आणि खालचा भाग गड म्हणून ओळखला जातो.

या शहराची स्थापना 1242 झाली झालेली आहे. इथे बुंदा मीना नावाचा सरदार राहत असे. याच्या नावावरूनच या शहराला बुंदी नाव पडले असे मानले जाते. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणजे इथले हाती पोल द्वार! भव्यता, श्रीमंती आणि मूळ कलेचा पाया असलेले हे शहर पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसते.

राजस्थानमधील कोटा येथून बुंदी अगदी 35 किलोमीटरवर. त्यामुळे राजस्थानात गेल्यानंतर कलेचा आस्वाद घेण्यासाठी बुंदी शहर बाकी इतर शहरांसारखंच नक्की सफर करा.