Travel

प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटल्यास हि काळजी अवश्य घ्या!

कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला प्रवास करावाच लागतो. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रवासासाठी बाहेर पडणे गरजेचे असते. या दरम्यान आपल्याला कधी अस्वस्थ वाटले किंवा आपले आरोग्य चांगले नसले, तर मात्र आपण प्रवास कसा करावा असे प्रश्न आपल्याला पडतात! याचे नियोजन कसे करावे ते जाणून घेऊ:

अतिरिक्त काळजी घ्या: काळजी नव्हे तर अतिरिक्त काळजी घ्या. प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी डॉक्टर कडे जाऊन सर्व तपासणी करून घ्या. औषधे जवळ ठेवा.

आरोग्याबद्दल माहिती द्या: जिथे कामानिमित्त अथवा कार्यानिमित्त जाणार आहात तिथे आधीच आरोग्याची कल्पना द्या. प्रवासादरम्यान त्रास झालाच तर ती मंडळी मदतीला येऊ शकतील.

अन्न खाताना लक्ष द्या: बाहेर खाणे प्रवासात होतेच. त्यामुळे, जे काही खाल त्याकडे लक्ष द्या. अर्बट चर्बट खाऊ नका. आहारातून दुखणी वाढतील असे वागू नका. अन्न सुरक्षित आहे ना याची काळजी घ्या.

तेथील डॉक्टरांची माहिती जवळ ठेवा: जिथे जाणार आहात तिथे कोणते डॉक्टर आहेत त्यांची माहिती ऑनलाईन मिळवा. अपॉइंटमेंट आधी देऊ शकतात का किंवा धडक गेल्यानंतर तुम्हाला तिथे तपासला जाईल का याची देखील खात्री करून घ्या. कोणाच्या काळात घेतल्या जाणाऱ्या सर्व खबरदार्‍या तिथे घेतल्या जातात का हेदेखील एकदा तपासून बघा.

या काळात प्रवास जरी अवघड झाला असला तरी देखील स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थित सोशल डिस्टन्स पाळून प्रवास करणे जमायलाच हवे. अशा काळामध्ये कोणत्या खबरदारी घ्यायला हव्यात, आणि तुमची बॅग कशी पॅक करायला हवी? इथपासून ते प्रवासादरम्यान तुमचे सीट कुठे हवे? इथपर्यंत प्रत्येक बाबीची वैयक्तिक रित्या चौकशी करा आणि त्यानुसारच निर्णय घ्या.