Home » ऐकावे ते नव्वलच!दगडाची ‘अंडी’ देणाऱ्या या खडकाने उडवली सर्वांची झोप…
Travel

ऐकावे ते नव्वलच!दगडाची ‘अंडी’ देणाऱ्या या खडकाने उडवली सर्वांची झोप…

आजपर्यंत आपण प्राण्यांनी आणि पक्षांनी अंडी दिली असे ऐकलेले आहे.अंडी देणारी कोंबडी आणि अंडी देणारा साप हे आपण सगळ्यांनी ऐकलेले आहे आणि आपल्याला माहीत देखील आहे परंतु अंडी देणारा दगड आहे हे ऐकल्यावर आश्चर्य वाटेल! तुम्ही म्हणसाल दगड कुठे अंडी देत असतो का? हो तर अशा देखील दगड आहे जो अंडी सारखी दगड बाहेर टाकतो.या दगडाने अनेक वैज्ञानिकांची झोप उडवली आहे.तर आज आपण या दगडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत…

जगामध्ये अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत.निसर्गामध्ये अशी अनेक रहस्य आहेत जी वैज्ञानिकांनी उलगडली आहेत परंतु अशीही काही रहस्य आहे जी अजूनही उलगडली नाही.निसर्गामध्ये अशा खुप साऱ्या गोष्टी आहे ज्याचे आपल्याला आश्चर्य वाटेल.निसर्ग जणूकाय रहस्याची खाण आहे! 

प्रत्येक चमत्कारामागे काही न काही वैज्ञानिक कारण असते हे सिध्द झाले तरीही निसर्गामध्ये अजून अशीही काही रहस्ये आहे जी रहस्ये विज्ञानालाही उलगडलेली नाहीत.चीनच्या कियान्नान बुयेई मियाओ या भागात असाच एक खडक आहे ज्याचे आपल्याला आश्चर्य वाटेल.परंतु अशीही काही रहस्य आहेत जी निसर्गाने अजूनही पोटात लपवून ठेवलेली आहेत.

२० मीटर लांबी असणारा आणि ६ मीटर उंचीचा खडक दर ३० वर्षांनी दगडाची अंडी बाहेर टाकतोआणि त्यामधून हळूहळू लांबट गोल अंड्याच्या आकाराची दगडे तयार होतात.ही दगडे ३० वर्षांनंतर आपोआप  खाली गळून पडतात.या दगडालाच ‘चानडान’ असे देखील म्हणतात.

'चानडान'या शब्दाचा अर्थ अंडे देणारा खडक असा होतो.कधीकधी तर हे गोळे ३०० किलेा वजनाचेही असतात. त्यांचा व्यास ३० ते ६० सेंमीचा असतो.चीनमधील लोक या दगडांना दैवी चमत्कार मानतात.चीनी लोक या दगडांना शुभ मानतात आणि घरी घेऊन जातात.यामुळे या दगडांची संख्या कमी होत चालली आहे त्यामुळे सरकारने आता अशी ७० दगडी अंडी संरक्षित ठेवली आहेत.

चीनमधील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ही दगडे ज्याठिकाणी आहे तिथे अगोदर समुद्र होता कालांतराने त्यामधून या सारखी दगडे उचलली गेली.या खडकामध्ये सोडियम कार्बोनेट जास्त प्रमाणात असते आणि या खडकपासूनच ही अंड्यासारखी गोल दगडे बनतात.

परंतु अजूनही हे सिध्द झालेले नाही की या दगडातून निघणारी अंडीसारखी ही दगडे ३० वर्षाततुन एकदाच का बाहेर पडतात आणि या दगडाचा आकार अंड्यासारखाच का असतो.