Home » आर्यन खानच्या अगोदर ‘या’ बॉलिवूड स्टारला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते…
Uncategorized

आर्यन खानच्या अगोदर ‘या’ बॉलिवूड स्टारला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते…

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान आणि इतर ५ आरोपींना मुंबई क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी जामीन नाकारत त्यांची आर्थर रोड या कारागृहात रवानगी करण्यात आली.आर्यन खानला काही दिवस मुंबईमधील आर्थर रोड या कारागृहामध्ये काढावे लागणार आहे.आज दुपारी आर्यनसह इतर  आरोपींची रवानगी आर्थर रोड या कारागृहात करण्यात आली.यामध्ये महत्वाची बाब म्हणजे या कारागृहामध्ये दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते त्याच कोर्टमध्ये आर्यनला ठेवण्यात आले आहे.

आर्थर रोड कारागृह कसे आहे?

मुंबई सेंट्रल जेललाच आर्थर कारागृह म्हणून ओळखले जाते.इंग्रजांच्या काळामध्ये १९२६ ला या कारागृहाची निर्मिती झालेली आहे.मुंबईमधील सर्वात जुने आणि सर्वात मोठे कारागृह म्हणून या कारागृहाची ओळख आहे. शहरातील जास्तीतजास्त कैद्यांना या कारागृहात ठेवले जाते.हे कारागृह जवळपास एक हेक्टर जागेवर उभारलेले आहे.

या कारागृहामध्ये कैद्यांची खुप गर्दी असते.या कारागृहामध्ये जास्तीतजास्त ८०० कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे परंतु इथे त्यापेक्षा जास्त कैदी ठेवले जातात.जुलै मध्ये या कारागृहामध्ये ८ बॅरेक्स तयार करण्यात आली.त्यामध्ये २०० कैद्यांना ठेवता येते.

अजमल कसाब,अबू सालेम,संजय दत्त यांना देखील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते…

दहशतवादी अजमल कसाबला देखील आर्थर रोड कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते.तेव्हा हे कारागृह चांगलेच चर्चेत आले होते.तसेच अंडरवर्ल्डशी  संबंधित असणारा अबु सलेम यालाही देखील याच तुरुंगात शिक्षा भोगावी लागली.हेच नाही तर शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यालाही याच कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते.बॉलिवूड स्टार सुरज पांचाल आणि शाईनी अहुजा यांना देखील याच कारागृहात ठेवण्यात आले होते.

या कारागृहातील काही हिंसक घटना…

२००६ मध्ये आर्थर रोड या कारागृहामध्ये छोटा राजन च्या टोळीतील आरोपी आणि दाऊद इब्राहिम यांच्या मध्ये खुप मोठा वाद झाला होता. तेव्हापासून दोन विरोधी गटातील आरोपींना कारागृहातील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येते.त्यानंतर २०१० मध्ये मुस्तफा डोसा आणि अबु सालेम यांच्यामध्ये हाणामारी झाली होती.अबु सलेम याच्या चेहऱ्यावर चमच्याने हल्ला करण्यात आला होता.हे दोन्ही आरोपी मुंबई साखळी बॉ’म्बस्फोट मधील आरोपी आहेत.

आर्यन खानची १ नंबरच्या बॅरेक मध्ये रवानगी…

मुंबई ड्र’ग्ज प्रकरणामधील आर्यन खान आणि त्यासोबत असणाऱ्या  ५ आरोपींना आर्थर रोड कारागृहामध्ये १ नंबरच्या बॅरेक्स मध्ये ठेवण्यात आले आहे.हे बॅरेक कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर आहे.इतर कैद्यांना जशी वागणूक दिली जाते तशीच वागणूक यांना दिली जाणार आहे.

तुरुंगाबाहेरच अन्न घेता येणार नाही.त्यामुळे जितकी दिवस कारागृहात राहील तितके दिवस इतर आरोपीप्रमाणे कारागृहातीलच अन्न खावे लागणार आहे.आर्यन खान आणि त्याच्यासोबत असणाऱ्या आरोपींना को’रो’ना’ची लक्षणे आढळली तर त्यांची को’रो’ना चाचणी करण्यात येणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व आरोपींना ५ दिवस विलीगिकरणात ठेवण्यात येणार आहे.

आर्यन कडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आढळलेले नाही असे म्हणत वकील माणशिंदें यांनी आर्यन च्या जमिनीसाठी खुप युक्तिवाद केला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.