Uncategorized

स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम वापरत आहात? काय सांगितल्या आहेत बँकेने महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घ्या!

आज-काल बँकिंग हे एटीएम किंवा ऑनलाइनवरच अवलंबून आहे. असे असून देखील अनेकदा ऑनलाईन व्यवहारांमध्ये गैरप्रकार पाहायला मिळतात. आणि ग्राहकांना मोठे आर्थिक नुकसान देखील सोसावे लागते. कित्येक ग्राहकांचे एटीएम कार्ड हरवतात, कितीतरी लोकांना ऑनलाईन व्यवहारांमध्ये आर्थिक दृष्ट्या घोटाळा झाल्याचे लक्षात येते. या सगळ्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेने आता ग्राहकांसाठी नऊ सोप्या टिप्स एटीएम वापरण्याच्या आधी लक्षात ठेवायला सांगितले आहे!

  1. एटीएम मशीन वर जाऊन आपण पैसे काढतो. असे करताना आपला पिन तिथे टाकावा लागतो. त्यामुळे कीपॅड नेहमी हाताने लपवावे जेणेकरून कोणालाही पिन कळणार नाही.

2. पिन आणि कार्ड डिटेल्स अगदी जवळच्या व्यक्तीला सुद्धा देऊ नयेत.

3. अनेकांना कार्डच्या मागे पिन लिहून ठेवायची सवय असते. तुमचे कार्ड कधी हरवले तर त्या व्यक्तीला ह्याचा फायदा होऊ शकतो म्हणून स्वतःचा पिन कधीच एटीएम कार्ड च्या मागे लिहू नका.

4. ई-मेल, मेसेज किंवा कॉलवर कोणालाही आपल्या कार्डची माहिती देऊ नका. स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे की, बँक कधीही या गोष्टींबद्दल तुम्हाला विचारत नाही.

5. अनेक जण पिन पटकन लक्षात राहावा म्हणून स्वतःची जन्मतारीख किंवा महत्त्वाच्या तारखा पिन म्हणून वापरतात. असे न करता अंदाज कोणालाच येऊ शकत नाही असा पिन तुमच्या कार्डचा असावा.

6. अनेक जण पैसे काढल्यानंतर किंवा एटीएमचा वापर केल्यानंतर मिळणारी रिसीट तसेच फेकून देतात. असे न करता ती पावती तुमच्याकडे ठेवा किंवा ती फाडून डस्टबीन मध्ये टाका. त्याच्यावर असलेली माहिती देखील गुन्हेगारांसाठी पुरेशी ठरू शकते.

7. नेहमी अशाच एटीएम मध्ये जाऊन पैसे काढा जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. जेणेकरून काही फसवणूक झालीच तर तुमच्याकडे निदान पुरावा असेल.

8. एटीएम वापरण्यापूर्वी कीपॅड किंवा कार्डचा जो स्लॉट असतो त्याची व्यवस्थित तपासणी करून घ्या. अनेकदा असेही अनुभव ग्राहकांना आले आहेत, ज्यात फसवणूक करणाऱ्या लोकांनी डिवाइस चिकटवून ठेवून त्यांची माहिती एकत्रित केली आणि नंतर त्या लोकांची आर्थिक फसवणूक झाली.

9. तुमच्या मोबाईलवर तुमच्या अकाउंट ची पूर्ण माहिती येईल असे अलर्ट मोबाईल मध्ये घालून ठेवा. जेणेकरून तुमच्या अकाउंट संबंधित प्रत्येक व्यवहार तुमच्याकडे येईल आणि तो तुमच्या परवानगीशिवाय होऊ शकणार नाही.