Home » सपाट पाय असलेल्या व्यक्तींना सैन्यामध्ये का नाकारले जाते,जाणून घ्या…
Uncategorized

सपाट पाय असलेल्या व्यक्तींना सैन्यामध्ये का नाकारले जाते,जाणून घ्या…

भारत देशाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी भारताचे लष्कर खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणाऱ्या सैन्याच्या अंगी धाडस ,शौर्य,शारीरिक सामर्थ्य असणे खूप आवश्यक मानले जाते व यामुळेच भारतीय लष्कराची निवड प्रक्रिया हि देशभरातील काही महत्त्वपूर्ण कठीण परीक्षां पैकी एक मानली जाते.भारतीय लष्कराला शत्रूशी सामना करताना स्वतःचे शारीरिक आणि मानसिक स्थैर्य टिकवून ठेवणे खूप महत्त्वपूर्ण असते व म्हणूनच भारतीय लष्कराच्या निवड प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही क्षमतांची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते.

शत्रूशी दोन हात करताना शारीरिक दृष्ट्या निरोगी असणे खूपच आवश्यक असते.निवड प्रक्रियेनंतर सुदधा प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त बनविण्यावर भर दिला जातो.भारतीय लष्करामध्ये निवड होण्यासाठी काही अगदी मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते.

भारतीय सैन्यदलामध्ये पायांची ठेवण सपाट असलेल्या व्यक्तींना निवडले जात नाही.भारतीय लष्करामध्ये पायांची सपाट ठेवण असलेल्या व्यक्तींची निवड का केली जात नाही यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत ती आज आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय लष्करामध्ये भरती होण्याची इच्छा असलेल्या तरुणांना पायांची सपाट ठेवण म्हणजे नक्की काय हे कळत नाही व त्यामुळे ते तणावात ही असतात.लहान मूल जेव्हा जन्मास येते तेव्हा त्याच्या पायाला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो व ते सपाट असतात.साधारण तीन ते चार वर्षांचे होईपर्यंत लहान मुलांच्या पाय सपाट राहत नाहीत त्यांना मध्यभागी वळण येते.मात्र काही व्यक्तींना यानंतरही अशाप्रकारे पायांना मधून वळण येत नाही त्यामुळे पाय सपाट राहतात.आपल्या पायाची ठेवण सपाट आहे का हे पाहण्यासाठी घरच्या घरी आपण एक सोपी पद्धती वापरू शकतो.यामध्ये पायाच्या टाचेवर पाय न टेकवता उभे राहण्याचा प्रयत्न करावा.अशा प्रकारे पायांमधील कोणतीही वेदना न होता जर आपण उभे राहू शकला तर आपले पाय सपाट नाही असा निष्कर्ष आपण काढू शकतो.

सैन्य दलामध्ये सपाट पायांची ठेवण असलेल्या व्यक्तींना प्रवेश का नाकारला जातो या मागचे कारण म्हणजे देशातील सर्वोच्च संरक्षण व्यवस्था असलेल्या सैन्या मधील सैनिक किंवा अधिकाऱ्यांना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे हे सर्वात महत्त्वपूर्ण असते. शारीरिक तंदुरुस्तीसाठी सैन्यदलातील व्यक्तींना लांब पल्ल्याच्या अंतरांवर पळणे  किंवा चालणे यांसारखे शारीरिक कसरती कराव्या लागतात.पायांची सपाट ठेवण असलेल्या व्यक्तींना इतक्या जास्त प्रमाणात कसरत करणे शक्य नसते. 

आपल्या पायातील वळणा द्वारे उत्तम धावपटू हे खूप वेगाने धावू शकतात व या पायातील वळणामुळे किंवा पाठीच्या कण्यावर कोणताही ताण येत नाही किंवा दुखापत होत नाही.मात्र सपाट ठेवण असलेल्या पायांनी धावल्यामुळे सर्व ताण हा गुडघे आणि मणक्यावर येतो यामुळे दुखापत होऊ शकते किंवा आर्थरायटिस सारखे आजार भविष्यात होऊ शकतात.

पायांची सपाट ठेवण असलेल्या व्यक्तींना केवळ कसरतीच्या कामांमध्ये नव्हे तर रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा कधीकधी पायावर ताण येतो व हा ताण वेदनादायक ठरतो.यासाठी काही सोपे उपाय सांगितले जातात.त्यामुळे पायाची ठेवण तर बदलू शकत नाही मात्र पायांना आराम निश्‍चितच मिळू शकतो.पायांची सपाट ठेवण असलेल्या व्यक्ती आपल्या शूज मध्ये एक प्रकारचा सोल वापरतात त्यामुळे पायांना आवश्यक त्या ठिकाणी थोडेसे वळण मिळते व गुडघ्यांवर आणि पाठीवर येणारा ताण कमी होतो.तसेच अनवाणी पायांनी रेतीमध्ये चालल्यामुळे सुद्धा या समस्येवर आराम मिळू शकतो असे सांगितले जाते.