Uncategorized

स्तनदा मातांना फायदेशीर आहे ‘हा’ पदार्थ; अजूनही आहेत बरेच फायदे!

थंडीमध्ये अनेकदा भूक जास्त लागते. त्यामुळेच थंडीत आरोग्य सुधारते असे म्हणतात. थंडीमध्ये आपण पौष्टिक पदार्थांचे सेवन जास्त केल्याने देखील वजन वाढण्यासाठी मदत होते. थंडीत कुडकुडायला लागले की गरम चहा किंवा कोणतही गरम पेय प्यायल्याने बरे वाटते.

याच्या सोबत खायला आपण अनेकदा डिंकाचे लाडू करतो. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे आणि शास्त्र आहे. डिंकाचे सेवन हे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी करतात. शरीराला मिळणारी उष्णता याने वाढते आणि हाडांची वेदना दूर करण्यासाठी डिंक उपयुक्त असतो.

डिंकामुळे सांधेदुखीच्या वेदना दूर होतात. डिंक आणि मेंदूची क्षमता वाढते. मेंदूची झालेली झीज भरून काढण्यासाठी सुद्धा डिंक उपयुक्त असतो. प्रतिकारशक्ती हिवाळ्यामध्ये थोडी कमी होते आणि ती वाढविण्याचे काम डिंकाच्या माध्यमातून केले जाते.

स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू दिले जातात. त्यामागे असणारे कारण देखील तसेच आहे. प्रसूतीनंतर त्या स्त्रीच्या शरीरातील शक्ती कमी झालेली असते. हाडांमधील कॅल्शियम देखील कमी झालेले असते. ही सगळी झीज भरून काढण्यासाठी डिंक मदत करतो. स्तनदा मातांना स्तन वृद्धीसाठी आणि जास्त दूध यावे म्हणून देखील डिंकाचे लाडू दिले जातात.

त्वचा नितळ करण्यासाठी आणि त्वचेचा ओलसरपणा टिकून ठेवण्यासाठी मदत करतो. रक्ताची कमतरता भरून काढण्या पासून ते खूप उसाची समस्या दूर करण्यापर्यंत डिंक उपयुक्त आहे.