Uncategorized

सालींमध्ये दडले आहे जीवनसत्व!

आरोग्यासाठी हितकारक भाज्या-फळे हे आवश्यक हवेत असे आपण अनेकदा सल्ले ऐकत असतो. परंतु याही पुढे जाऊन भाज्यांच्या आणि फळांच्या सालींचा मध्ये असणारे जीवनसत्वे आपल्या त्वचेला मऊ करतात. हृदयविकाराच्या आजारांमध्ये बचाव करतात. याहूनही उपर अनेक फायदे आहेत जे आपण आज जाणून घेणार आहोत.

केळीच्या सालीमध्ये फील गूड हार्मोन म्हणजेच सेरोटोनिन असते. अस्वस्थ वाटले किंवा निराश वाटत असेल तर केळीची साल उपयुक्त ठरू शकते. केळीचे साल दहा मिनिटे स्वच्छ पाण्यात उकळवून पाणी थंड झाल्यावर गाळून प्यावे. ल्युटीन नावाच एंटीऑक्सीडेंट डोळ्यातील पेशींना देखील अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून संरक्षण देऊन मोतीबिंदू चा धोका कमी करते.

लसणाच्या सालिमध्ये हृदयरोग, स्ट्रोक सारख्या समस्या दूर करण्याची ताकत असते. लसणाच्या सालीमध्ये फिनाईलप्रोपेनाईट नावाच्या एंटीऑक्सीडेंट ची उपस्थिती असते. त्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. दररोज अनुशापोटी दोन पाकळ्या खाल्ल्याने किंवा भाजी आणि चटणी मध्ये लसुण घातल्याने अनेक फायदे मिळतात.

संत्र, मोसंबी यांचे साल देखील हृदय रोगावर उपयुक्त ठरतात. तुम्ही या फळांची साल भाजी किंवा सूप मध्ये किसून घालू शकता. केक किंवा इतर गोड पदार्थांमध्ये देखील याचा उपयोग करून त्याचे सेवन करू शकता. भोपळा अत्यंत औषधी असतो. त्याचबरोबर त्याच्या सालीमध्ये कर्करोग नष्ट करण्याचे आणि त्यांच्यापासून बचाव करण्याचे तत्व असतात. बीटा कॅरोटीन फ्री रेडिकल्स चा नायनाट होतो. त्यामुळे कर्करोगाचा समूळ नाश होतो.